माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती कराड / प्रतिनिधी : कराड येथील विमानतळावर लवकरच फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहि...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
कराड / प्रतिनिधी : कराड येथील विमानतळावर लवकरच फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परवेज दमानिया यांनी दिली.
अॅम्बीशीअस फ्लाईंग स्कुल प्रा. लि व एअरस्पीड एव्हीएशन प्रा. लि या दोन्ही कंपन्याचे अधिकारी त्यांचे विमान घेऊन कराड येथील विमानतळावर फ्लाईंग अकादमी सुरु करण्याच्या उद्देशाने विमानतळाची पाहणी करण्यास आज आले होते.
लवकरच कराड विमानतळावर फ्लाईंग अकादमी सुरु करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत कंपनीचे डायरेक्टर व सीईओ परवेज दमानिया, डायरेक्टर मनोज प्रधान, विनोद मेनन,
मिहीर भगवती यांच्यासह मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, पै. नानासाहेब पाटील, रवी बडेकर, शिवाजी जमाले, इंद्रजीत चव्हाण, मोहनराव शिंगाडे आदी उपस्थित होते.
कराड येथील विमानतळ मुंबई, गोवा व पुणे या ठिकाणासाठी मध्ये केंद्र आहे. गोवा आणि पुणे विमानतळावर हवाई दलाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे खाजगी विमान वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. मात्र, कराड विमानतळावर दमानिया अकॅडमी स्कूल सुरू करण्याबाबत दोन महिन्यात अंतिम निर्णय होईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी फ्लाइंग स्कूल सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दमानिया अकॅडमीने एक विमान कराड येथील विमानतळावर आणले होते. तसेच येथील धावपट्टीची पाहणी केली. देशात केवळ 10 ठिकाणी तर महाराष्ट्रात 3 ठिकाणी हे स्कूल आहे. या स्कूलमध्ये स्थानिकांसह देशभरातून विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतील. तसेच त्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन खासगी विमान कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. या कोर्सच्या माध्यमातून कराड परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.