$type=ticker$snippet=hide$cate=0

शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवण्याची कूटनीती

एखादी गोष्ट खोटी असली, तरी ती वारंवार सांगितली गेली, तर ती खरी वाटू लागते. शेतकर्‍यांच्या बाबतीतही तेच केलं जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याव...

एखादी गोष्ट खोटी असली, तरी ती वारंवार सांगितली गेली, तर ती खरी वाटू लागते. शेतकर्‍यांच्या बाबतीतही तेच केलं जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरच्या तिरंग्याच्या अवमानाबाबत असाच खोट्याचा आधार घेऊन जो अपप्रचार केला जात आहे. त्यातून आपण तिरंग्याचाही अवमान करीत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. भारताच्या समाजघटकांत शेतकरी आणि जवानांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. देशाच्या सुरक्षिततेची जवानांना काळजी, तर देशातील 130 कोटी नागरिकांच्या पोटाची शेतकर्‍यांना चिंता. जवान आणि शेतकरी यांच्या बाबतच्या आदरातूनच तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान अशी घोषणा केली होती.  


देशाच्या सुरक्षिततेत आणि देश जगवण्यात या दोन घटकांचं महत्त्व त्यातून अधोरेखित होतं; परंतु सध्याचं सरकार अर्थसंकल्पात या दोन घटकांसाठी जादा निधीची तरतूद केल्याचं एकीकडं सांगत असताना दुसरीकडं या दोन घटकांवर अप्रत्यक्षरीत्या अन्याय करीत आहे. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दलातील महिलांसाठी कायमस्वरुपी कमिशन (नियुक्ती) देण्याचा आदेश एक वर्षापूर्वी दिलेला असताना त्याची कारवाई होत नाही, म्हणून महिलांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. देशात गेल्या सत्तर दिवसांपासून शेतकरी तीनही कृषी कायदे मागं घेण्याच्या मागणीसाठी आंदोलनं करीत आहेत. कायदे मागं घेण्यावर ते दुराग्रहाची भूमिका घेत असतील, तर सरकारची भूमिकाही समंजसपणाची नाही. दोन्ही बाजूंच्या संवादात ताठरपणाची भूमिका घेतली जात आहे. अहंपणा आड येत आहे. एकानं एक पाऊल मागं घेतलं, तर दुसरा दोन पावलं मागं घेईल; परंतु दोन्ही बाजूंचा ताठरपणा आडवा येत आहे. अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण येते. काश्मीरच्या नेत्यांनी राज्यघटनेच्या चौकटीत चर्चा करायला नकार दिला. त्यामुळं तणाव वाढला होता. वाजपेयी यांचा कायम संवादावर भर असायचा. प्रश्‍न कितीही किचकट असला, तरी त्यातून संवादाच्या माध्यमातून मार्ग निघतो, असा अटलजींचा विश्‍वास होता. संवादाची दारं त्यांनी कधीही बंद केली नाहीत. याचा अर्थ त्यांच्यात कठोरपणा नव्हता, असं कुणी म्हणणार नाही. हळव्या आणि कवीमनाचे अटलजी तितकेच धीरोदात्तही होते. अटलजींनी काश्मीर नेत्यांना नका राज्यघटनेच्या चौकटीत चर्चा करू; परंतु माणुसकीच्या भावनेतून तरी चर्चा करणार, की नाही, असं विचारलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी राज्यघटनेच्या चौकटीतच चर्चा केली. हे उदाहरण मुद्दाम दिलं. आताचं सरकार मात्र एकतर्फी संवादावर भर देत आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचं कुणीही समर्थन करणार नाही; परंतु या आंदोलनात अगा जे घडलेच नाही, त्यावर बोलून आपण राष्ट्रध्वजाचाही अवमान करीत आहोत, हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्याही लक्षात येत नाही, याला काय म्हणावं? ज्यांनी बॅरिकेडस् तोडली, पोलिसांवर हल्ले केले, गाड्यांची तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई करायचं सोडून सरकार आंदोलक नेत्यांचीच गळचेपी करायला लागलं आहे.

गेल्या सत्तर दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या तंबूंवर तिरंगे दिमाखाने फडकत आहेत. ट्रॅक्टरवर शीखांच्या ध्वजाबरोबर तिरंगे डौलदारपणे फडकताना दिसत आहेत. देशाच्या संरक्षणात ज्या समुदायाचा मोठा वाटा आहे, त्या समुदायाला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याचा अवमान झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळं देशाची मान खाली गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तिरंग्याचं रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, यात कोणतीही शंका नाही. तिरंग्याचा अवमान केला असेल, तर तिथं उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीवरून त्याचं फुटेज घेऊन गेल्या सात दिवसांत कारवाई करायला सरकारचे हात कुणी बांधले होते का, या प्रश्‍नाचं उत्तर मिळत नाही. त्यामुळं मग भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी मोदी यांना थेट आव्हान देऊन तिरंग्याचा अवमान करणार्‍याला अटक करा, असं सांगितलं. त्यावरही सरकारनं अजून काहीच केलेलं नाही. तिरंग्याचा आधार घेऊन खोटं बोलणं हा खरा तर देशद्रोहच; तो देशद्रोह राजकारणासाठी घटनात्मक प्रमुखांनी करावा, हे अति झालं. शेतकर्‍यांच्या आंदोलनात अगोदर खलिस्तानी घुसल्याचा आरोप करण्यात आला. नंतर त्यात चिनी सहभागाचा आरोप करून अकलेचे तारे तोडण्यात आले. त्यानंतर डाव्यांचा या आंदोलनात सहभाग असल्याचा आरोप खुद्द मोदी यांनी केला. त्यानंतर शेतकर्‍यांच्या आंदोलनात माओवादी घुसल्याचा आरोप करण्यात आला. हे सर्व पाहता आंदोलक शेतकर्‍यांना देशद्रोही ठरविण्याचा जणू कट रचला आहे, की काय अशी शंका येते. इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात दडून बसेलल्या खलिस्तान्यांना बाहेर काढण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविलं. त्यामुळं शीख समुदायात प्रचंड नाराजी होती. लष्करातील गटही बंड करण्याच्या तयारीत होता; परंतु तसं काही झालं नाही. इंदिरा गांधी यांना गुप्तचर संस्थांनी शीख सुरक्षा रक्षकांना त्यांच्या सेवेतून काढून दुसरीकडं नेमण्याची सूचना केली होती. त्याचं कारण इंदिराजींच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मिळाला होता; परंतु इंदिराजींनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेतून एका धर्माच्या लोकांना दूर करणं म्हणजे संपूर्ण समुदायावर अविश्‍वास दाखवण्यासारखं आहे, असं सांगून तसं करण्यास नकार दिला. देशप्रेम म्हणतात, ते याला. स्वतःच्या प्राणापेक्षा देश आणि त्यातील जनतेवरचा विश्‍वास याला त्यांनी महत्त्व दिलं. इंदिराजींची हत्या शीख समाजाच्या दोन अंगरक्षकांनी केली. त्यानंतर जे झालं, त्याची किंमत देशाला मोजावी लागली. आता मात्र वेगळंच घडतं आहे. न घडलेल्या घटनांचं भांडवल केलं जात आहे. देशात 26 जानेवारीला काही माथेफिरूंनी पोलिसांचं कडं तोडून, त्यांच्यावर हल्ले करीत, लाल किल्ल्यावर कूच केली. तिथं एका बाजूला शीख धर्माचा झेंडा फडकावण्यात आला. ते गैरच आहे; परंतु हे करताना कुठंही तिरंग्याचा अवमान केला नाही. तिरंगाही तितक्याच डौलात फडकत होता. बीबीसींसह अन्य वाहिन्यांवर तसं स्पष्ट चित्रण दिसत होतं; परंतु राष्ट्रपती, पंतप्रधानांनी मात्र तिरंग्याचा अवमान झाला, असं धादांत खोटं सांगितले. शेतकर्‍यांना देशद्रोही ठरविण्याची घाई जणू झाली आहे. आंदोलन मिटत नाही, म्हणून त्यांच्यावर भावनिक दबाव आणायचा हा प्रयत्न आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारनं आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडं जाणार्‍या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भिंतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत. टिकारी सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीची भिंत ( सिमेंट ब्लॉक ) यापूर्वीच बांधली गेली होती. बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले आहेत. आता रस्ता खोदून तिथं त्यामध्ये लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इथली सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सीमेवर रोड रोलरदेखील आणण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर हे रोड रोलर उभारले जाऊ शकतात. शेतकर्‍यांनी इथून दिल्लीत ट्रॅक्टरनं घुसण्याचा प्रयत्न केला तर ते पंक्चर होईल. संपूर्ण टायर खराब होईल. येथून बाहेर पडणं कठीण होईल. आधीच सीमेवर सुरक्षा दलाच्या 15 कंपन्या तैनात आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसक घटनांनंतर इथं दररोज सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. कोणत्याही शेतकर्‍याला इथून दिल्लीला जाऊ दिलं जाणार नाही, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. एकही शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसू शकणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडं वाढती सुरक्षा व्यवस्था आणि दररोज होणार्‍या बॅरिकेडिंगमुळं शेतकर्‍यांमध्येही भीती पसरली आहे. देशाच्या अन्नदात्यांना रोखण्यासाठी अशी व्यवस्था केली जातं आहे. आम्ही शेतकरी नसून त्रास उपद्रवी आहोत, असं शेतकरी म्हणाले. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर, उत्तर प्रदेशात संशयित आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोनशेपेक्षा जास्त ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे, तर पोलिसांची ही कारवाई शेतकर्‍यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावरून, शेतकर्‍यांवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आहे; मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. सिकंदरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 220 ट्रॅक्टर मालकांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. हे ट्रॅक्टर सार्वजनिक रस्त्यांच्या व्यावसायिक कामांसाठी वापरण्यात येत होते आणि अल्पवयीन मुलं हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यातून काही अपघात झाले आहेत. तसंच, काही ट्रॅक्टर अवैध खाणकामांसाठीही वापरण्यात येत होते, असं पोलिस सांगत असले, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.



Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15316,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4314,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवण्याची कूटनीती
शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवण्याची कूटनीती
https://1.bp.blogspot.com/-JR4eTPPNlC4/YBqjRoDXLsI/AAAAAAABn4w/60RTx4GOzEQYikCFBYosPo78Ha7KQkV_ACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-JR4eTPPNlC4/YBqjRoDXLsI/AAAAAAABn4w/60RTx4GOzEQYikCFBYosPo78Ha7KQkV_ACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_52.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_52.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content