$type=ticker$snippet=hide$cate=0

गडाखांचा शिवसेनेला फारसा फायदा नाही

भागा वरखडे/अहमदनगर : मुळा सहकारी साखर कारखाना, शनीशिंगणापूर देवस्थान, जिल्हा बँकेस विविध ठिकाणी शंकरराव गडाख यांनी स्वकीयांचीच निवड केली आहे...

भागा वरखडे/अहमदनगर : मुळा सहकारी साखर कारखाना, शनीशिंगणापूर देवस्थान, जिल्हा बँकेस विविध ठिकाणी शंकरराव गडाख यांनी स्वकीयांचीच निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून येऊन सत्तेसाठी शिवसेनेबरोबर मांडवली केलेल्या गडाखांना मंत्रिपद मिळाले; परंतु त्यांचा फायदा झाला असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र फारसा फायदा झालेला नाही. 


यशवंतराव गडाख यांना दोन्ही काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, राज्य सहकारी बँकेचे संचालकपद, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, विधान परिषदेचे सदस्यत्त्व, लोकसभेचे सदस्यत्व आदी पदे दिली. शंकरराव गडाख यांना दोनदा विधानसभेची उमेदवारी दिली. सुनीता गडाख यांना पंचायत समितीचे सभापतिपद दिले. असे असताना त्यांना केवळ मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून यशवंतरावांनी केवढा त्रागा केला होता. प्रवरेच्या तीरावरच मंत्रिपदे दिली जातात, असा त्यांचा आरोप आहे. गडाख यांनी केवळ नेवाशापुरते राजकारण पाहिले. पक्षापेक्षा नातेवाइकांचे हित पाहिल्याने शेवगाव विधानसभा मतदारसंघ आणि नेवासे विधानसभा मतदार संघ असे दोन्ही तालुके राष्ट्रवादी काँग्रेसला गमवावे लागले. 

नगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे यांच्यावर गडाख यांचा राग आहे; परंतु थोरात आणि विखे यांना जिल्ह्यात गटबांधणी करता आली. तसा गट गडाख यांना गेल्या 40 वर्षांत बांधता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी जवळीक असतानाही त्यांनी ऐनवेळी पवार यांना दगा दिला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. बाळासाहेब मुरकुटे युतीचे उमेदवार होते. त्या मुरकुटे यांचा पराभव करण्यासाठी गडाख त्यांच्या शेतकरी क्रांतीमोर्चा पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीत उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केले. निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून लगेच हाती धनुष्यबाण दिला. राज्यात तीन पक्षांची सत्ता असताना थोरल्या गडाखांनी दोन्ही काँग्रेसवर टीका केली. 

काँग्रेसी विचारांच्या व्यक्ती शिवसेनेत सत्तेसाठी येतात आणि गरज भागली, की शिवसेना सोडतात. हा अनुभव जिल्ह्यात अनेकांच्या बाबतीत आला. त्यांच्या सहकारी संस्थांत कधीच शिवसैनिकांना स्थान मिळाले नाही. राधाकृष्ण विखे, भाऊसाहेब वाकचौरे, अशोक काळे, भानुदास मुरकुटे, तनपुरे अशांच्या बाबतीत तो अनुभव आला. अनिल राठोड आमदार असताना त्यांनी कुटुंबापलीकडे शिवसेना वाढविली. अनेकांना मोठी पदे मिळवून दिली. तसे दोन्ही काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्यांच्या बाबतीत झाले नाही. या नेत्यांनी संघटनेत पदे दिली; परंतु सहकारी संस्था किंवा सरकारमध्ये सामान्य शिवसैनिकांना काहीच मिळू दिले नाही. आता गडाख यांच्या ताब्यातील मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था, शनीशिंगणापूर देवस्थान यांच्याबाबतीत निष्ठावंत शिवसैनिकांना किती पदे मिळाली, हा संशोधनाचा भाग आहे. आमदारकी, मंत्रिपद असताना जिल्हा बँकेत अन्य कुणाला संधी देणे शक्य होते; परंतु गडाख यांनी तेवढे मोठेपण दाखविले नाही. 


चौकट

काचा खाली न करण्याची शिक्षा

सहा वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांचा पराभव झाला, त्याचे कारण त्यांचा जनतेशी तुटलेला संबंध हेच होते. ते मतदारसंघात असले, तरी गाडीच्या काचा खाली करून कुणालाही नमस्कार घालीत नसत. फोनवर त्यांच्यांशी संपर्क साधणे दुर्मीळ असायचे. त्यांचा फोन कधी लागायचचा नाही, तर लागला, तर उत्तर मिळत नसायचे. अशा नेत्यांला जनता धडा शिकवित असते. तो तसा शिकविलाही. आता त्यातून बोध घेऊन त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही, तर नेवाशाच्या जनतेने भल्याभल्यांना धडा शिकविला आहे, तशी ती पुन्हा शिकविल, याची जाणीव ठेवली पाहिजे.   


Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10381,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,29,बुलढाणा,878,ब्रेकिंग,16545,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13791,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3740,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गडाखांचा शिवसेनेला फारसा फायदा नाही
गडाखांचा शिवसेनेला फारसा फायदा नाही
https://ourneta.com/wp-content/uploads/2020/03/Shankarrao-Gadakh-Patil.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_523.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_523.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content