$type=ticker$snippet=hide$cate=0

बाँबस्फोटाचे इराण कनेक्शन?

नवी दिल्लीतील इस्त्राईलच्या दूतावासासमोर झालेल्या बाँबस्फोटाची तीव्रता कमी असल्याने जीवितहानी झाली नसली, त्याचा मोठा संदेश देण्याचा दहशतवाद्...

नवी दिल्लीतील इस्त्राईलच्या दूतावासासमोर झालेल्या बाँबस्फोटाची तीव्रता कमी असल्याने जीवितहानी झाली नसली, त्याचा मोठा संदेश देण्याचा दहशतवाद्यांचा हेतू साध्य झाला आहे. इस्त्राईलचे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती तसेच अन्य देशांशी चांगले संबंध झाल्याने आखाती देशातील इस्त्राईलविरोधी देश आक्रमक झाले आहेत. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी इस्त्राईलमधील नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यात आतापर्यंत पाकिस्तानचा हात होता; परंतु दिल्लीच्या हल्ल्यामुळे


आता एक नवीन संघटना आणि नवीन राष्ट्रातील दहशतवादी पुढे आल्याचे दिसते आहे. दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला, तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. दिल्लीत ज्या परिसरात स्फोट झाला, तो परिसर अति महत्त्वाच्या व्यक्तींचा आहे. त्या भागांत अनेक देशांचे दूतावास आहेत. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. हा परिसर व्हीव्हीआयपी असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात बाँबस्फोट होतो आणि त्या भागातील हालचालीची माहिती न मिळाल्याने गुप्तचर यंत्रणेचे अपयश ही समोर आले आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाला. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा अंदाज आहे. बॉम्बशोधक पथक आणि इतर तपास यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू होता. नवी दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे आधीच तणाव असताना दुसरीकडे बाँबस्फोट झाल्यानेे तपास यंत्रणांवरचा ताण वाढला आहे.  दिल्लीत इस्त्राईली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे धागे दोरे शोधण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांचे विशेष पथक कामाला लागले आहे. घटनास्थळावरुन वेगवेगळे साहित्य जप्त करण्यात आले. त्यात एक गुलाबी रंगाचा दुपट्टा आहे, जो अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. त्याचा या स्फोटाशी काही संबंध आहे का, याचा शोध तपास यंत्रणा करीत आहेत. या स्फोटाची जबाबदारी ’जैश ए उल हिंद’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

 स्फोटचा तपास करण्यासाठी अब्दूल कलाम रोडवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे; पण पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार परिसरातले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे कामच करत नव्हते. ते बंद आहेत. जे कॅमेरे सुरू आहेत त्यातील गेल्या तीन दिवसातील फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे. इतक्या महत्त्वाच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे राहू शकतात, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सुरक्षेशी आपण कसे खेळतो आहोत, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. आतापिक अप, ड्रॉप गाड्यांचीही चौकशी केली जात आहे. इस्त्रायली दूतावासाजवळ येण्यासाठी ज्या भागातून कॅब प्रवाशांना पिक अप करतात आणि ड्रॉप करतात, तिथल्या सगळ्या कॅबची चौकशी केली जात आहे. त्यासाठी ओला उबेरशीही पोलिसांनी संपर्क साधला आहे. किती जणांना नेमक्या त्याच ठिकाणी ड्रॉप केले किंवा पिक अप केले तेही तपासले जात आहे. बाँबस्फोटाची वेळ सायंकाळी पाच वाजून 28 मिनिटांची आहे. त्यामुळे त्याअगोदर किती माणसे आली, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी घेतलेल्या ’जैश उल  हिंद’ या दहशतवादी संघटनेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; पण तपास यंत्रणा माहिती गोळा करण्यात गुंतलेल्या आहेत. ’जैश ए उल हिंद’ने स्फोटाची जबाबदारी घेत हा तर फक्त ट्रेलर असल्याची धमकी दिली आहे. दिल्ली हल्ल्याची जबाबदारी ’जैश उल हिंद’ने घेतली असली, तरी ही नेमकी कोणत्या प्रकारची संघटना आहे, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ही संघटना कोणाशी जोडली गेली आहे, ही कोणती स्लीपर सेल आहे का, याबाबतची माहिती मात्र अद्यापही मिळालेली नाही. दिल्लीत स्फोट झालेल्या घटनास्थळापाशीच तपास यंत्रणांच्या हाती एक पत्र लागले आहे. त्यामुळे या हल्ल्यामागचे इराणी कनेक्शन सार्‍यांचे लक्ष वेधत आहे. हा तर पक्त एक ट्रेलर आहे, अर्थात ही फक्त सुरुवात आहे असे या पत्रात म्हटले आहे. शिवाय या पत्रात दोन इराणी व्यक्तींच्या हत्येचाही उल्लेख आहे. सेनेतील कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय यामध्ये अणुवैज्ञानिक आर्देशिर यांच्या हत्येचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इस्त्रायली दूतावासाजवळचे जवळपास सर्व महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज स्फोट घडवणार्‍यांपर्यंत नेऊ शकतात, अशी आशा तपास यंत्रणा एनआयएला आहे. एका कॅबमधून दोघे उतरले, त्या कॅबनेच दोघा संशयितांना घटनास्थळाजवळ सोडल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले आहे. विशेष पथकाने कॅब ड्रायव्हरशी संपर्क साधला आहे. संशयितांचे स्केच बनवण्यात आले आहे. त्यावरुन त्यांचा शोध सुरू आहे. इराणचे सर्वांत शक्तिशाली मेजर जनरल होते कासिम सुलेमानी. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे तीन जानेवारी 2020 रोजी कासिम सुलेमानी यांची इराकची राजधानी बगदादमध्ये हत्या करण्यात आली. अमेरिकेने बगदादच्या एअरपोर्टजवळ ड्रोनने कासिम यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यात ते मारले गेले. अमेरिकेने नंतर या हत्येचे समर्थन केले. सुलेमानी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर तर होतेच; पण गुप्तचर यंत्रणचेही ते प्रमुख होते. इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयतुल्लाह अल खामेनी यांनाच ते थेट रिपोर्ट करायचे. कासिम यांनी इराणसाठी पश्‍चिम आशियात मोठे नेटवर्क उभे केले. त्यातूनच अमेरिकाविरोधी मोठी फळी तयार झाली. त्यांच्या हत्येनंतर इराणमध्ये प्रक्षोभ उसळला. खुद्द सर्वोच्च धर्मगुरु अंत्यविधीत ढसाढसा रडल्याचे जगाने पाहिले. कासिम यांच्या अंत्यविधीला एवढी गर्दी उसळली, की झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांनी जीव गमावला. जागतिक स्तरावर अमेरिका आणि इस्त्राईल हे एकमेकांचे मित्र आहेत. भारतही मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या दोन्ही देशांचा जवळचा मित्र झाला आहे. त्यामुळे इस्त्राईलला टार्गेट करणे म्हणजे एकाच वेळेस भारत आणि अमेरिकेलाही टार्गेट करण्यासारखे आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत झालेल्या स्फोटाचे धागे आणखी कुठपर्यंत जातात हे पाहणे महत्वाचे आहे. दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली स्फोटानंतर मुंबई विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे, तर पुण्यातील सर्व संवेदनशील ठिकाणावरील बंदोबस्तासाठी असणार्‍या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10372,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,28,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16531,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13777,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3734,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बाँबस्फोटाचे इराण कनेक्शन?
बाँबस्फोटाचे इराण कनेक्शन?
https://1.bp.blogspot.com/-x2kmq1eUjE4/YBa1lVZossI/AAAAAAABnxs/Xg9kCV7CsCAIrxAOixS6w-ZDO9JAqsQxwCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-x2kmq1eUjE4/YBa1lVZossI/AAAAAAABnxs/Xg9kCV7CsCAIrxAOixS6w-ZDO9JAqsQxwCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_53.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_53.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content