$type=ticker$snippet=hide$cate=0

गुंड मारणेविरोधात जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा

निर्दोष सुटल्यानंतर तीनशे गाड्यांच्या ताफ्यसह मिरवणूक; ड्रोनद्वारे चित्रीकरण पुणे/प्रतिनिधीः तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प...


निर्दोष सुटल्यानंतर तीनशे गाड्यांच्या ताफ्यसह मिरवणूक; ड्रोनद्वारे चित्रीकरण

पुणे/प्रतिनिधीः तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणार्‍या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या मिरवणुकीचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.


मारणे यांच्या विरोधात तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मावळ, उर्से टोलनाका भागात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या गर्दी जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 15 हजार रुपये किंमतीच्या ड्रोनने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यत आले आहे. 

मारणेची दोन जणांच्या खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी ’महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस’ टाकत त्यांची एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात तीनशेहून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. मारणे हा सोमवारी सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. या वेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्स्प्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या. एरव्ही टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनाला सोडत नाही; मात्र मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन -तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहोचला. गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा संघर्ष सुरू होतो की काय याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातल्या मुख्य गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी एका माजी खासदारांनी पुढाकार घेऊन एकमेकांवरील गुन्हे सोडवण्यासाठी सगळे साक्षीदार फोडले. त्यामुळे सहा महिन्याच्या कालावधीत सगळे प्रमुख म्होरके मोक्कातून सुटून बाहेर आले.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4652,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17930,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15315,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4313,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गुंड मारणेविरोधात जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा
गुंड मारणेविरोधात जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा
https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2021/02/gajana-don.jpg?impolicy=website&width=496&height=330
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_560.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_560.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content