$type=ticker$snippet=hide$cate=0

पुद्दुचेरीतील नाट्य

देशात केवळ पाच राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस सत्तेत आहे. त्यापैकी पुद्दुचेरीत पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. ...



देशात केवळ पाच राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस सत्तेत आहे. त्यापैकी पुद्दुचेरीत पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राहुल गांधी पुद्देचेरीच्या दौर्‍यावर येण्याच्या एक दिवस आधीच तिथे काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिला. गेल्या काही वर्षांपासून पुद्देचेरीत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांशी संघर्ष करावा लागत होता. भारतीय जनता पक्षाला तिथे फारसे स्थान नव्हते; परंतु तीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर विधानसभेत भाजपचा शिरकाव झाला. आता आठ जूनला विधानसभेची मुदत संपणार आहे. त्याअगोदर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 

काँग्रेसला आमदार निवडून आणता येतात; परंतु सांभाळता येत नाहीत, हे गोवा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमधील आमदारांच्या पक्षांतराने दाखवून दिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुद्दुचेरीमध्ये झाली. काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने आता तेथील सरकार अल्मपतात आले आहे. काँग्रेस आणि द्रमुुक आघाडी सरकारकडे चौदाच आमदार राहिले आहेत. बहुमत गमावूनही राजीनामा देत नसल्याबद्दल आता या सरकारवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या एका मंत्र्यासह चार आमदारांनी तिथे पक्ष सोडला आहे. त्यातील दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नव्याने राजीनामा देणारे आमदारही त्याच पक्षात जाणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींमागे कोण आहे, हे लपून राहिलेले नाही. राज्यपाल किरण बेदी यांना हटविण्याची मागणी वारंवार करूनही आतापर्यंत भाजपने त्यांना बदलले नाही. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांना परत बोलवले आहे. दिल्ली णि गोव्यात कार्यक्षम पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या आणि नंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात चमकोगिरी केल्यानंतर त्या दिल्लीच्या राजकारणात त्या आल्या. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत बेदी यांना काहीच करता आले नाही. भाजपचा पराभव झाला. त्यानंतर बेदी यांना पुद्दुचेरीच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच उभा डाव मांडला. राष्ट्रपतींनी आताच बेदी यांना का मागे बोलावले आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांचे आताच का ऐकले, याचा बिटवीन द लाईन अर्थ शोधावा लागतो. बेदी यांना अचानक तिथल्या उपराज्यपालपदावरून हटवण्यात आले. त्यांना हटवण्याची मागणी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सुरुवातीपासून करीत होते. त्यामुळे बेदी यांच्या जाण्याचा त्यांना अत्यानंद झाला आहे. याच बेदी यांनी सत्ताधार्‍यांचा विरोध पत्करून 2017 मध्ये तीन जणांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ दिली होती, तरीही त्यांना हटवण्यात आले यामागे त्यांचा स्वभाव आहे. उपराज्यपाल असल्याचे विसरून मुख्यमंत्री असल्यासारखा कारभार त्या करीत होत्या. भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसच्या आमदारांना त्यांनी जेरीस आणले होते. त्यामुळे आपले दुकान चालू ठेवायचे, तर भाजपमध्ये जाण्यावाचून गत्यंतर नाही, असा विचार करायला ते बाध्य झाले. आता तेच आमदार भाजपमध्ये आल्यावर बेदी पुन्हा त्यांच्या मागे लागतील आणि उद्या भाजपचे सरकार बनले तरी त्यांची ‘मुख्यमंत्रीगिरी’ सुरूच राहील, अशी भीती मूळच्या आणि नंतर भाजपमध्ये आलेल्या आमदारांनाही असणार. त्यामुळे पुढचे सारे सुरळीत होण्यासाठी त्यांची गच्छंती झाली असावी.

भारतीय जनता पक्षाने सत्यपाल, किरण बेदी, भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल नेमून आपला कार्यभाग साधून घेतो. आता आणखी एखादे ‘कोश्यारी’ पुद्दुचेरीत नेमले जातील आणि पुढचा कार्यभाग साधला जाईल, हे उघड आहे. काँग्रेसच्या नाराज नेत्यांना न राहुल गांधी कधीच भेटत नाही. त्याची किंमत काँग्रेसला ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत मोजावी लागली. आताही त्यांनी नाराज आमदारांचे मतपरिवर्तन करायचे होते. राहुल आधीच तिथे जाऊन आपल्या आमदारांना भेटले असते तर ही पडझड झाली नसती, असे तिथले काँग्रेसचे नेते सांगत आहेत. केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत मंगळवारी घटनाक्रम वेगाने बदलला. सकाळी काँग्रेसचे आणखी एक आमदार ए. जॉन कुमार यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांत राजीनामा देणारे ते चौथे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसच्या व्ही. नारायणसामी सरकारच्या बहुमताचा आकडा डळमळीत झाला. तथापि, आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा नारायणसामी यांनी केला. दरम्यान, सायंकाळी पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. नव्या उपराज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत तेलंगणच्या राज्यपाल सुंदरराजन तमीलसाई यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. बेदी मंगळवार दुपारपर्यंत सामान्य दिवसांप्रमाणेच सक्रिय होत्या. त्यांनी राज्यात कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. त्यांना हटवण्याची मागणी बर्‍याच दिवसांपासून होत होती. मुख्यमंत्री नारायणसामींनी त्यासाठी दोन वेळा राजभवनबाहेर धरणे आंदोलन केले आहे. पुद्दुचेरी विधानसभेत तीन नामनियुक्त सदस्यांसह एकूण सदस्य संख्या 33 आहे. सध्या ही संख्या घटून 28 झाली आहे. बहुमतासाठी 15 सदस्यांची गरज आहे. काँग्रेसकडे स्वत:चे 10 आमदार राहिले आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघमचे तीन आणि एका अपक्षासह एकूण 14 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. विरोधातही एनआर काँग्रेसचे सात, अद्रमुकचे चार आणि भाजपच्या तीन (नामनियुक्त) आमदारांसह 13 आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही. तथापि विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दर्शविला आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचे नेते निवडणूक प्रचार सुरू करतील. यावेळी राहुल गांधी अनेक जाहीर सभांनाही संबोधित करतील. राहुल गांधींच्या भेटीपूर्वी आमदारांनी पक्ष सोडल्याची चर्चा काँग्रेसला मोठा धक्का देणारी आहे. अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाचे नेते अंबाजगन यांनी सरकार अल्पमतात आल्याचे सांगून नारायणसामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नारायणसामी यांना पदावर कायम राहण्याचा हक्क नाही आणि त्यांनी नैतिक कारणावरून त्वरित राजीनामा द्यावा, असा टोला त्यांनी लगावला. नारायणसामी यांनी आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा केला. एनआर काँग्रेसने सात आणि एआयएडीएमकेच्या चार जागांवर विजय मिळविला होता. उपराज्यपाल किरण बेदी यांनी भाजपच्या तीन सदस्यांना मतदानाचा हक्क दिला होता, त्यामुळे विधानसभेच्या आमदारांची संख्या वाढून 33 झाली होती. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या 15 वरून 10 वर आली आहे, तर विधानसभेत सरकार आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या 14-14 झाली आहे. चार आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर विरोधी पक्षांनी बहुमत चाचणीची मागणी केली आहे. ए. जॉन कुमार हे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे निकटचे मानले जात होते. विधानसभेच्या 2015 च्या निवडणुकीत त्यांनी नेल्लिथॉप जागेवर विजय मिळविला आणि नारायणसामी यांच्यासाठी जागा रिक्त केली. कुमार यांनी नंतर 2019 मध्ये कामराज नगर पोटनिवडणूक जिंकली. अलीकडेच, दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर ते परत आले. राजीनामा देणार्‍यांमध्ये आमदार ए जॉन कुमार, ए नमसिवम, मल्लादी कृष्णा राव आणि ई थेपायंतन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसचे आमदार एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कार्यात सहभागी केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी नमसिव्हम आणि थेपायनंथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, बाकीचे नेतेही लवकरच भाजपमध्ये येऊ शकतात

 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुद्दुचेरीतील नाट्य
पुद्दुचेरीतील नाट्य
https://1.bp.blogspot.com/-VUbcXxPOBcU/YC5HC5yEM5I/AAAAAAABoUY/SIdE8y5DH38h1S351rqkOt26zZOak-NDQCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-VUbcXxPOBcU/YC5HC5yEM5I/AAAAAAABoUY/SIdE8y5DH38h1S351rqkOt26zZOak-NDQCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_568.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_568.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content