इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या 15 वे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपम...
इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या 15 वे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता अडीच वर्ष उलटली आहे.
भाजपचे सात सदस्य फुटले त्यापैकी पाच जणांचे राष्ट्रवादीला मतदान तर दोघे गैरहजर राहिले. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मध्ये पडले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला जनतेने दिलेल्या सत्तेत स्वारस्य नाही असे सांगत प्रारंभी जयंत पाटील यांनी भाजपला गाफील ठेवत करेक्ट कार्यक्रम केला. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करतोच असे सांगत जयंत पाटील यांनी भाजपला नेस्तनाबूत केले. भाजपची पूर्ण बहुमताने आलेली सत्ता प्रथमच उलटली. ऑनलाईन होणार्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपच्या सदस्यांनी खरे क्लब हाऊसमधून मतदान केले. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रिया सुरुवात झाली होती. त्यानंतर 15 मिनिटे अर्ज माघारीसाठी होते. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाईन मतदान झाले. गेले चार दिवस भाजपचे सदस्य नॉटरिचेबल होते. त्यामुळे भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम साशंक होते. महापौर पदासाठीचा आघाडीचा उमेदवार काँग्रेस की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्स ही आज काय होता. सकाळी काँग्रेसच्या उत्तम साखळकर व राष्ट्रवादीच्या मैनुद्दीन बागवान यांनी माघार घेत दिग्विजय यांचा मार्ग मोकळा केला. भाजपने 42 जणांचे बहुमत होते. मात्र, त्यांची सकाळपर्यंत त्याची जोडणी 36 जणापर्यंत झाली होती. दोन सहयोगी सदस्य पैकी भाजपचे उपमहापौर पदाची उमेदवारी मगदूम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी काँग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्या शिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनी मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चारमतांसह हक्काची एकूण सात मते फुटली आणि भाजपचे संख्याबळ 36 वर घसरले.