पुणे/प्रतिनिधी : ’’राज ठाकरे यांना सध्या लोकप्रियतेची गरज आहे म्हणून ते वीजबीलाच्या मुद्यावरुन आरोप करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे...
पुणे/प्रतिनिधी : ’’राज ठाकरे यांना सध्या लोकप्रियतेची गरज आहे म्हणून ते वीजबीलाच्या मुद्यावरुन आरोप करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. राज यांच्या विरोधात जयंत पाटील यांंनी केलेल्या वक्तव्यावरुन मनसेच्या नेत्यांनी याबाबत नाराजी दर्शवली आहे. याबाबत, ’’लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज यांना लोकप्रियतेची गरज होती, म्हणून त्यांची एक सभा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील होता का, असा सवाल मनसे पुणे शहरच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटील यांना विचारला आहे.
राज यांनी राज्यातील वीज बिलांच्या मुद्यावरुन राज्य सरकाराला धारेवर धरले आहे; मात्र राज यांच्या भूमिकेवर पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज हे लोकप्रियता मिळावी, म्हणून वीज बिलांच्या मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. पाटील यांच्या या वक्तव्यावरुन मनसे नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, की पाटील आपण आज मंत्री आहात. आपल्या सरकारमधील मंत्री ऊर्जामंत्रीपदी असूनही वीजबिलाच्या मुद्यावरुन सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. त्यामुळे सराकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. लोकप्रियतेची गरज आहे ते लोकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे नको ते वक्तव्य करण्याऐवजी वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा.