श्रीरामपूर ः राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या लजपतरायवाडी, जवाहरवाडीसह वाड्या वस्त्यांवर बिबट्याने अनेक महिन्यांपासून धुम...
श्रीरामपूर ः राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या लजपतरायवाडी, जवाहरवाडीसह वाड्या वस्त्यांवर बिबट्याने अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, काल तर जवाहरवाडी येथील वाडकर वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिका मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने पिंजरा लावून सुद्धा हा बिबट्या जेरबंद होत नसल्याने, सर्वसामान्य नागरिक चांगलेच धास्तावले आहे. शेती महामंडळाच्या या वाड्या वस्त्यांलगद आश्रय या बिबट्याच्या टोळीने घेतला आहे. लगद असलेल्या शेतकर्यांच्या शेतात रात्रीचे वास्तव्य करून भरदिवसा वाड्या वस्त्यावरील शेतकर्यांच्या जनावरावर डल्ला मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. वाड्या वस्त्यांवरील कामगार व शेतकरी शेतात कामानिम्मित गेल्यानंतर हा बिबट्या या वस्त्यावरील लोकांवर झडप मारत आहे. रात्री तर टिळकनगर -एकलहरे या हमरस्त्यावर ये जा चालू असल्याने रात्रीची प्रवासी वाहतूक जवळपास बंद झालेली दिसून येते त्यामुळे रात्री 10 नंतर कामगार व शेतकरी आप-आपली दारे लावून झोपून घेतात मात्र जनावरे गाय, शेळी,मेंढी उघड्यावर असल्याने त्यांची चिंता रात्रभर घरात बसून कामगार व शेतकरी करीत आहे. शेतकरी हे महामंडळाच्या क्षेत्रालगत राहत असल्याने लगत वस्त्या लांबपल्ल्यावर आहे, वन विभागाने या परिसरात पिंजरा लावला असला तरी वन अधिकार्यांनी परिसरात जागेवर येऊन योग्य ते नियोजन करून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते विलास ठोंबरे, माजी उपसरपंच व नवनियुक्त ग्रामपंचायत सद्यस्य रमेश कोल्हे सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.