अहमदनगर/प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाला आहे. या दहा जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाख़ल करण्यात आले...
अहमदनगर/प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाला आहे. या दहा जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाख़ल करण्यात आले आहे. एकाच घरातील 10 जणांना कोरोना झाल्याने खळबख उडाली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झाली. या कुटुबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला होता.
पुण्याहून घरी आल्यानंतर त्याला ताप आल्यानंतर त्याची तपासणी केली, तेव्हा त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुटुंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकूण दहा जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यानी कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी म्हटले आहे.