कोपरगाव शहर प्रतिनिधी - तालुक्यातील करंजी गावाला नुकताच आर आर पाटील सुंदर गाव चा पुरस्कार व दहा लाख रुपये चे बक्षीस अहमदनगर येथे...
कोपरगाव शहर प्रतिनिधी - तालुक्यातील करंजी गावाला नुकताच आर आर पाटील सुंदर गाव चा पुरस्कार व दहा लाख रुपये चे बक्षीस अहमदनगर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पालकमंत्री ना. हसनमुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल करंजी शिवसेनेच्या वतीने सरपंच छबुराव आहेर, उपसरपंच रविंद्र आगवन व ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी शिवसेनेचे शिवाजी जाधव, तालुका युवासेना अध्यक्ष चंद्रकांत भिंगारे,शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे, अमृत संजीवनी चे देविदास भिंगारे, सुवर्ण संजीवनीचे विकास शिंदे, शेतकरी संघाचे अरुण भिंगारे, माजी सरपंच अनिल डोखे,ऍग्रो लक्ष्मी बँकेचे बळीराम थेटे, गोरख नाना भिंगारे, गणेश भिंगारे, सोपान शहाने,तुकाराम आगवन, तुळशीदास मलिक, डॉक्टर शेळके, बाबुराव जाधव, रामदास चरमळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी शिवसेनेचे शिवाजी जाधव यांनी करंजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतीने आज पर्यंत सर्व सहमतीने गावच्या विकासाची कामे केली तशीच ती यापुढे देखील जोमाने चालू राहतील व ही मिळालेली रक्कम गावच्या महत्वाच्या सर्वांगीण विकास कामासाठी ग्रामपमचायतीच्या वतीने खर्च होईल अशी अपेक्षा करतो असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
चौकट
हे यश म्हणजे सर्व ग्रामस्थांच्या एकोप्याचे फळं असून, सदर बक्षिसाची रक्कम ही शासनाच्या नियमानुसार गावातील महत्वाच्या विकास कामासाठी खर्च केली जाईल.
रविंद्र आगवन
उपसरपंच करंजी