मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झालीय. पेट्रोल 80 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपया 30 पैशांनी वाढ झालीय. तेल उत्पा...
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झालीय. पेट्रोल 80 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपया 30 पैशांनी वाढ झालीय. तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. गेल्या 1 जानेवारी पासून पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत 16 वेळा वाढ केली आहे. कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात 29 पैसे आणि डिझेल दरात 38 पैसे वाढ करण्यात आली आहे.
गेल्या दहा महिन्यात पेट्रोलमध्ये 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेल 15 रुपयांनी महागले आहे. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतला जाऊन पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली जाते. दरवाढीनंतर आज मुंबईत लीटरमागे पेट्रोलचा दर 94.64 रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता 85.32 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलने सर्वोच्च पातळी गाठली असून, लीटरचा दर 88.14 रुपये झाले आहे. डिझेलचा भाव 78.38 रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचे दर 90.44 रुपये झाले आहे. डिझेलसाठी 83.52 रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 89.44 रुपये झाले आहे. डिझेलचा दर 81.96 रुपये झाला आहे. गेल्या 1 जानेवारीपासून पेट्रोलच्या दरात 4.24 आणि डिझेलच्या दरात 4.15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.