$type=ticker$snippet=hide$cate=0

मृतांच्या नावावर लाटलं निवृत्ती वेतन

पैसे खाण्याची विकृती माणसाला कोणत्या थराला कधी आणि कशी घेऊन जाईल, याचा भरवसा नसतो. पैसे खाण्यासाठी काहीही क्लृप्त्या लढविल्या जातात. पगारात ...

पैसे खाण्याची विकृती माणसाला कोणत्या थराला कधी आणि कशी घेऊन जाईल, याचा भरवसा नसतो. पैसे खाण्यासाठी काहीही क्लृप्त्या लढविल्या जातात. पगारात भागवा, असं अभियान कितीही राबविलं, तरी वरच्या पैशाची हाव काही सुटत नाही. त्यातूनच मग मृतांना जिवंत दाखवून, त्यांच्या नावावरचं निवृत्ती वेतन परस्पर लाटण्याचा प्रकार मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात उघडकीस आला आहे. 

    


माणसं हौस म्हणून रुग्णालयात जात नाहीत. त्यातच रुग्णालयात काम करणार्‍यांकडं वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं. इथं पैशापेक्षा सेवाभावी वृत्तीला महत्त्व असलं, तरी आता सेवाभावी वृत्तीपेक्षा आता तिथं व्यावसायिकता जास्त आली आहे. काही रुग्णालयं त्यांच्या सेवाभावी कामामुळं प्रसिद्धीस येतात, काही तेथील पंचतारांकित सुविधामुळं, तर काही रुग्णालयं आर्थिक लुटीमुळं. या तीनही गटात न मोडणारी; परंतु कायम वादाच्या भोवर्‍यात अडकणारी रुग्णालयंही आहेत. त्यात मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचा समावेश करावा लागेल. महापालिकेचं रुग्णालय म्हटलं, की तिथं गैरप्रकार आलेच असं समीकरण रुढ झालं आहे. देशातील काही नामवंत दंत रुग्णालयात या दंत रुग्णालयाचा समावेश आहे, तसंच तीनशे कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूति केल्याचं चांगलं काम केल्याचा गौरव या रुग्णालयाच्या वाटयाला आला आहे. चांगल्या कामापेक्षा वाईट कामांनीच हे रुग्णालय कायम चर्चेत असतं. पावसाळ्यात रुग्णालयात येत असलेलं पाणी, जमिनीवर रुग्ण झोपवून केले जात असलेले उपचार, एकामागून एका डॉक्टरांच्या आत्महत्या, रुग्णांच्या आत्महत्या अशा घटनांमुळं या रुग्णालयाची कुप्रसिद्धी झाली. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. या रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील कर्मचार्‍यांनी पेन्शन घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. तीन मृत कर्मचार्‍यांना जिवंत असल्याचं दाखवत त्यांचं पेन्शन तसंच कुटुंब निवृत्ती वेतन लाटण्यात आलं. विभागीय चौकशीमध्ये सुमारे दहा लाखांची रक्कम हडप केल्याचं उघडकीस येताच रुग्णालयातील अधिकार्‍यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. लुटली गेलेली रक्कम किती, यापेक्षा ती कशी लुटली गेली, हे जास्त महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेच्या कोषागार कार्यालयातून नायर रुग्णालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह आस्थापना विभागातील चौघांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावे आपल्या कार्यालयातून पेन्शनचे दावे मंजूर कसे करण्यात आले? याबाबत या नोटिशीमधून विचारणा करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या या नोटिशीला अधिकार्‍यांनी उत्तर देतानाच, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली. त्या वेळी आस्थापना विभागातील कारकून प्रसाद गोसावी हा ऑगस्ट महिन्यात कंकू रावलिया हिचा सेवानिवृत्तीचा अर्ज घेऊन आला होता, हे लक्षात आलं. मुखपट्टी लावलेली एक महिला प्रसादसोबत आली होती. प्रसादनं तिची ओळख रावलिया यांची सून अशी करून दिली होती. त्यांनी सादर केलेला बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असलेला हयातीचा दाखला तसंच इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती बोगस असल्याचं लक्षात आलं. कंकू हिच्याप्रमाणंच आणखी दोन कर्मचार्‍यांच्या बाबतीत असं घडलं आहे.

कारकून मंडळी काय करतील, याचा कधीच भरवसा देता येत नाही. नायर रुग्णालयातील प्रसादनं मृत कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रसाद स्वतःच खाल्ला. प्रसाद गोसावी यानंच दिशाभूल केल्याचं विभागीय चौकशीतून समोर आलं. आपण अडकले जावू, या भीतीनं गोसावी यानं अखेर आपली चूक मान्य केली आणि तीन मृत कर्मचार्‍यांच्या नावानं लाटलेले नऊ लाख 91 हजार 700 रुपये महापालिका को ऑपरेटिव्ह बँकेत जमा केले. असं असलं, तरी फसवणूक, शासकीय रकमेचा अपहार आणि बोगस कागदपत्र तयार केल्यामुळं नायर रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून प्रसाद गोसावी याच्यावर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंकू रावलिया, निर्मला माघाडे आणि शांताबाई जाधव या तीन महिला कर्मचारी मृत असतानाही त्यांच्या हयातीचा बोगस दाखल तयार करून त्या जिवंत आहेत, असं भासविण्यात आलं. बनावट कागदपत्रं तयार करून त्यांच्या नावानं पेन्शन तसंच कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून घेण्यात आलं. प्रसाद गोसावी यानं बनावट कागदपत्रांसोबतच बोगस नातेवाइकही उभे केल्याचं चौकशीतून उघड झालं आहे. नायरमधील आस्थापना कार्यालयात अर्ज तसंच इतर कागदपत्रं जमा करताना मृत व्यक्तीचे वारसदार म्हणून त्यानं दुसर्‍याच व्यक्तींना उभं केलं. विशेष म्हणजे, या कालावधीत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला होता. त्यामुळं या बोगस वारसदारांना मुखपट्टी घालून अधिकार्‍यांसमोर हजर केल्यानं नातेवाइकांना ओळखता आलं नाही. आत्महत्या, बनावट नातेवाइक उभं करणं आदी घटनांबरोबरच बाळाची चोरी हा ही नायर रुग्णालयाच्या कामकाज पद्धतीतला दोष आहे. गेल्या वर्षी नायर रुग्णालयातून चोरी झालेल्या पाच दिवसांच्या नवजात बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं. एका अज्ञात महिलेनं या बाळाला पळवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि अवघ्या सहा तासांत हे बाळ शोधून त्याला त्याच्या पालकांकडं सोपवलं. शीतल साळवी असं या बाळाच्या मातेचं नाव.  दहिसर इथं राहणार्‍य शीतल यांनी पाच दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यांची प्रसुती सिझेरिअन पद्धतीनं झाली होती, त्यामुळं त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. जेव्हा शीतल या झोपलेल्या होत्या, तेव्हा एक अज्ञात महिला या वॉर्डात आली. तिनं हळूच बाळाला उचललं आणि कुणाला कळायच्या आत ती बाळाला घेऊन फरार झाली. ही महिला बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. संबंधित महिला सकाळपासूनच हॉस्पिटलमध्ये वावरत होती. तिनं बाळ पळवलं, ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालं. त्या वॉर्डची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षक काय करीत होते आणि या वार्डातील परिचारिका अन्य कर्मचारी काय करीत होते, हा प्रश्‍न पडतोच. एकीकडं बाळ सापडल्यानं कुटुंब आनंदी आहे, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनानं निष्काळजीपणा दाखवल्यानं ही घटना घडली. रुग्णालयात अनेक सुरक्षा रक्षक आहेत, वॉर्डात नर्स, डॉक्टर असूनही बाळ चोरी कसं झालं, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सध्या बाळाचा शोध लागला आहे; मात्र या प्रकरणामुळं नायर रुण्गालय पुन्हा एकदा वादात अडकलं होतं.

गेल्या महिन्यात याच रुग्णल्यातील डॉक्टर पायल तड़वीनं वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कटांळून आत्महत्या केली होती. पायलनं वरिष्ठांच्या कानावर घालूनही त्यांनी रॅगिंग करणार्‍यांवर काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळं पायलला आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. त्यानंतर डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी रॅगिंग करणार्‍या एका महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. भक्ती मेहरे असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. अन्य दोन फरार डॉक्टर्सचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानंही गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे. तसंच याप्रकरणी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं होतं. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचं रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या एका तरुण डॉक्टरांनी नायर रुग्णालयात आत्महत्या केली. त्याअगोदर एका कोरोना रुग्णानं इथं आत्महत्या केली. हे सर्व प्रकार पाहता अलिकडच्या काळात नायर रुग्णालय उपचाराऐवजी आत्महत्येचं केंद्र बनलं आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15316,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4314,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मृतांच्या नावावर लाटलं निवृत्ती वेतन
मृतांच्या नावावर लाटलं निवृत्ती वेतन
https://1.bp.blogspot.com/-K-txqrqNpk0/YDZMR8hU7DI/AAAAAAABokA/FP6Sx3C4zMw7EF35KI--hXDSdTatxONNgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-K-txqrqNpk0/YDZMR8hU7DI/AAAAAAABokA/FP6Sx3C4zMw7EF35KI--hXDSdTatxONNgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_605.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_605.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content