कराड / प्रतिनिधी : रेठरे बु।, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील क...
कराड / प्रतिनिधी : रेठरे बु।, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषीविद्या विभागात कार्यरत असणार्या प्रा. सारंग कुंभार यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याकडून पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. कुंभार यांचे संशोधन ऊस पिकावर असून, त्यांनी ’कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये ऊस पिकाची विविध अंतरावरती लागवड पध्दतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. दापोली कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. व्ही. महाडकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सर्व संचालक, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.