पुणे : कोरोनामुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावले असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी 'जीएसटी'तील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यात...
पुणे : कोरोनामुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावले असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी 'जीएसटी'तील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यात व्यापाऱ्यांचा बराच वेळ जात आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला (शुक्रवारी) 'कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कॅट) 'भारत बंद' पुकारला आहे.
पुण्यासह देशातील विविध प्रकारच्या ८४ व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहे. पुण्यातील द पूना मर्चंट्स चेंबर, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, पुणे खाद्यतेल व्यापारी संघटना, मार्केट यार्डातील पुणे ड्रायफ्रूट व मसाले व्यापारी संघटना, पुणे शुगर मर्चंट असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, पुणे टी मर्चंट असोसिएशन, पुणे आटा-रवा-मैदा व्यापारी संघटना, पुणे पोहा व्यापारी असोसिएशन आदी संघटनांचा या बंदमध्ये सहभाग आहे, अशी माहिती 'कॅट'चे राज्य शाखेचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.