इस्लामपूर / प्रतिनिधी : कुंभार समाज्याचा वीट व्यवसाय पारंपरिक आहे. यासाठी लागणारी मातीची 500 ब्रासपर्यंतची रॉयल्टी माफ असून कुंभार समाजाला ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : कुंभार समाज्याचा वीट व्यवसाय पारंपरिक आहे. यासाठी लागणारी मातीची 500 ब्रासपर्यंतची रॉयल्टी माफ असून कुंभार समाजाला रॉयल्टीबाबत नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना सातारा जिल्हाधिकारी यांना सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सूचना केल्याची माहिती कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश दरेकर यांनी दिली.
कराड येथे ना. बाळासाहेब पाटील यांंची रॉयल्टी संदर्भात भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व कुंभार व्यवसाय करणारे यांना 500 ब्रास पर्यंत मातीची रॉयल्टी माफ आहे. तरी महाराष्ट्रातील तालुका ठिकाणी तहसीलदारांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी सांगली जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष नंदकुमार सर्जेराव कुंभार, इस्लामपूर, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वसंतराव घोडनदीकर, विष्णूशेठ पाषाणकर, कोषाध्यक्ष अनंतराव कुंभार, पारंपारीक व्यवसाय आघाडी अध्यक्ष प्रकाश भालेराव, पारंपारीक व्यवसाय आघाडी उपाध्यक्ष बाळासाहेब ताथवडेकर, सुभाष शेठ कर्डेकर, सुरेश कुंभार, मनोजशेठ कुंभार, अरुण कुंभार, सुनीलशेठ कुंभार, दत्तात्रय कुंभार कार्याध्यक्ष, कानिफनाथ कुंभार, पद्माकर कुंभार उपस्थित होते.