सातारा : माता रामाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिल्यानेच ते सर्व क्षेत्रात जगजेत्ते झाले, असे प्रतिपादन सिनेअभिनेते राहुल मगदूम यांनी...
सातारा : माता रामाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिल्यानेच ते सर्व क्षेत्रात जगजेत्ते झाले, असे प्रतिपादन सिनेअभिनेते राहुल मगदूम यांनी केले.
येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ माता रमाई यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून राहुल मगदूम बोलत होते. अध्यक्षस्थानी वंचित’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, माता रमाई यांचे 9 व्या वर्षीच बाबासाहेब यांच्याबरोबर लग्न झाले होते. तेव्हापासूनच त्यांनी त्यागी भूमिकेतून अखेरपर्यंत अनेक संघर्ष करीतच सावली सारखी साथ दिली होती.
सिने अभिनेता राहुल मगदूम यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी, डॉ. आंबेडकर पुतळ्यास सुभेदार रामजी आदर्श पिता पुरस्कार विजेते अंकुश धाइंजे, सौ. अश्विनी नांगरे व अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राहुल मगदूम यांचा सत्कार अनिल वीर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी लोकजागर परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र भोसले, धम्मबांधव उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास वहागावकर, ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे, राजेंद्र कांबळे, ज्येष्ट पत्रकार विजय मांडके, सौ. लता बनसोडे, शाहीर श्रीरंग रणदिवे आदींनी माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केली. बी. एल. माने यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. अनिल वीर व संजय नितनवरे यांनी सूत्रसंचालन केले. समारोपप्रसंगी शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी माता रमाई’च्या जीवनावर पोवाडा सादर केला तर प्रा. माणिक आढाव यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास शाहीर मनोहर पवार, अॅड. हौसेराव धुमाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव बनसोडे, भगवान रणदिवे, शाहीर माधव भोसले, अमर गायकवाड, यशपाल बनसोडे, विकास तोडकर, शामराव बनसोडे, सुरज कांबळे, काका गाडे, सीताराम गायकवाड, लीलावती कांबळे, गोरखनाथ भोसले, सूरज माने, प्राचार्य मोहन शिर्के, बबलू गाडे, हणमंत माने, सोमनाथ धोत्रे, भिकाजी सावंत, सुनील गाडे, राजू तुपे, रफिक मुलाणी, सुनील गाडे, गव्हाळे आदी विविध संघटनेचे व क्षेत्रातील मान्यवर - कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.