म्हसवड / वार्ताहर : नवनिर्मित हुपरी नगरपरिषदेचे पहिले मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची नगरपरिषद विभाग महाराष्ट्र राज्य यांनी वसई-विरार महानगर...
म्हसवड / वार्ताहर : नवनिर्मित हुपरी नगरपरिषदेचे पहिले मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची नगरपरिषद विभाग महाराष्ट्र राज्य यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बढती दिली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील या शिक्षकाने मुर्तिजापूर मुख्याधिकारी यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे काम केले. या ठिकाणी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत प्रथम क्रमांक 10 लाखांचे बक्षीस मिळवून दिले. जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून अहमदनगर येथे भरीव कामगिरी, मुख्याधिकारी सोलापूर, म्हसवड (जि. सातारा), माणगंगा पुरात महत्त्वपूर्ण काम, जयसिंगपूर स्वच्छता अभियान स्पर्धेत प्रथम तर गडहिंग्लज शहर हागणदारीमुक्त केले. नवनिर्वाचित हुपरी नगरपरिषदेचे पहिले मुख्याधिकारी म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम काम केले. यानंतर त्यांनी सहाय्यक संचालक म्हणून औरंगाबादमध्ये काम केले. त्यांच्या कामाची पोचपावती देत नगरपरिषद विभाग महाराष्ट्र राज्य यांनी वसई-विरार या ठिकाणी उपायुक्त म्हणून पदोन्नती केली.