$type=ticker$snippet=hide$cate=0

साखर उद्योगाची कोंडी

संधी असते, तेव्हाच तिचा फायदा उठवायचा असतो, हे साधं तत्व. केंद्र सरकारला शेतीमाल आयात-निर्यातीच्या वेळी मात्र या तत्त्वाचा विसर पडतो. सरकार ...



संधी असते, तेव्हाच तिचा फायदा उठवायचा असतो, हे साधं तत्व. केंद्र सरकारला शेतीमाल आयात-निर्यातीच्या वेळी मात्र या तत्त्वाचा विसर पडतो. सरकार निर्णय घेतं; परंतु त्याच्या अंमलबजावणीची वेळ येते, तेव्हा मात्र हात आखडता घेतं. घोषणांचा कितीही पाऊस पडला, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्या पावसाचा फारसा उपयोग होत नाही. साखरेच्या निर्यातीबाबतही आता तोच अनुभव येतो आहे. साखर आणि इथेनॉल कुठं ठेवायचं, असा गंभीर प्रश्‍न साखर उद्योगापुढं आहे.

गेल्या सहा वर्षांपासून भारतात साखरेचं उत्पादन अतिरिक्त होत आहे. साखरेची वेळेवर निर्यात होत नसल्यानं साखरेचे साठे वाढत गेले. आता साखर कुठं ठेवायची, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरवर्षी देशाच्या गरजेपेक्षा जास्त साखर उत्त्पादन होतं. मागची शिल्लक साखर आणि जादा उत्पादन यामुळं दरवर्षी एक कोटी टन अतिरिक्त साखर साखरेचा बोजा घेऊन साखर हंगाम सुरू होत असतो. अतिरिक्त साखरेच्या उत्पादनातून मार्ग काढण्यासाठी निर्यात करायला हवी. जागतिक बाजारातील साखरेला गेल्या सहा वर्षापासून भाव कमी असतो. त्याचं कारण भारताप्रमाणं जागतिक बाजारातही साखरेचे भाव कमी आहे. भारतातील साखरेचा साठा कमी करण्यासाठी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. काही प्रमाणात साखरेची निर्यात झाली. साखर निर्यातीचं अनुदान वेळेवर मिळालं नाही, हा भाग वेगळा; परंतु काही प्रमाणात साखर निर्यात झाली. साखरेची निर्यात वेळेवर झाली नाही, तर भारताला ब्राझीलच्या साखरेशी स्पर्धा करावी लागते. गेल्या सहा वर्षांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्यानं कमी असल्यानं ब्राझीलनं इथेनॉल उत्पादनाऐवजी साखर उत्पादनावर भर दिला. जागतिक बाजारात साखर अतिरिक्त ठरण्याचं हे ही एक कारण आहे. ब्राझीलचा साखर हंगाम साधारण मार्चपासून सुरू होतो. त्यामुळं निर्यातीचे करार त्याअगोदर होऊन साखर जागतिक बाजारात जायला हवी. वेळेचं हे गणित साधलं गेलं नाही, तर मग मात्र जागतिक बाजारातील गणितं बदलू शकतात. या वर्षी भारतानं जागतिक साखर उत्पादन लक्षात घेऊन साखर निर्यातीचा निर्णय घेतला. साठ लाख टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी सरकार अनुदान द्यायचं ठरविलं. यंदा कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्यानं ब्राझील साखर उत्पादनाकडून इथेनॉलच्या निर्मितीकडं वळणार आहे. जागतिक बाजाराला त्याचा अंदाज आला आहे. त्यामुळं गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक भावानं साखर सध्या विकली जात आहे. त्याचा फायदा भारत सरकारनं घ्यायला हवा होता. त्यामुळं निर्यात अनुदान कमी द्यावं लागलं असतं. निर्यातीचा निर्णय घेऊन उपयोग नसतो, तर त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते. निर्यातीचा करार झाला; परंतु साखर निर्यातीसाठी कंटनेर उपलब्ध करावे लागतात. तेच न केल्यानं साखर निर्यातीच्या झालेल्या कराराची अंमलबजावणी करता आली नाही.  

भारत साठ हजार टन साखर निर्यात करायची होती. त्यातील तीस लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले होते. पहिल्या टप्प्यात तेवढी साखर निर्यात झाली असती, तर पुढच्या टप्प्यांतील करार करता आले असते; परंतु कंटेनरची उपलब्धता ही साखर निर्यातीत मोठी अडचण झाली आहे. भारताची साखर निर्यात 12 टक्क्यांनी घसरली आहे. भारतातून पन्नास लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. भारतातून या वर्षी दहा लाख टन साखर निर्यात झाली आहे. सरकारनं साखरेच्या निर्यातीवर प्रतिटन 5,833 रुपयांचं अनुदान दिलं आहे. अगोदरच कोरोनामुळं देशात प्रदीर्घ काळ हॉटेल, लग्न समारंभासह अन्य समारंभ बंद राहिले. त्यामुळं साखरेला फारसा उठाव नव्हता. अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली. आता कुठं पूर्वपदावर परिस्थिती येत आहे, असं वाटत असतानाच कोरोनाचे तीन स्ट्रेन देशात सापडले आहेत. बर्‍याच भागांत पुन्हा बंद सुरू झाला आहे. विवाह समारंभावर मर्यादा आल्या आहेत. त्याचा परिणाम पुन्हा साखरेच्या खपावर होण्याची शक्यता आहे. साखर उद्योगालाही ही भीती सतावते आहे. कोरोना काळात आयात कमी झाल्यानं परदेशातून कंटेनर येत नाहीत. याच कंटेनरमधून निर्यात होत असते. जादा पैसे मोजण्याची तयारी असूनही जहाजात पुरेशी जागा मिळत नसल्यानं  साखर निर्यात कशी करायची, हा मुख्य प्रश्‍न आहे. जूनपर्यंत कंटेनरची कमतरता भासू शकते. या वर्षाच्या उत्तरार्धातही कंटेनरची कमतरता कायम राहू शकते. जूननंतर भारतात मॉन्सून सुरू होतो आणि साखर निर्यात अवघड होते. भारतातील पांढर्‍या साखरेला सध्या 400-415 डॉलर प्रति टन भाव आहे. लंडनच्या वायदे बाजारात 480 डॉलर प्रतिटन असा साखरेचा भाव आहे. जानेवारीत सुमारे एक लाख टन साखरेची निर्यात झाली. मुख्यत: अफगाणिस्तान, आफ्रिकन देश, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे निर्यात झाली. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर साखर कारखान्यांना सध्या साखर कुठं ठेवायची, असा मुख्य प्रश्‍न पडला आहे. साखर विकली गेली नाही, तर शेतकर्‍यांना उसाचे पैसे कसे द्यायचे आणि कामगारांचे पगार तरी कसे करायचे, हा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. साखरेवर कर्ज घेतलेलं असतं. मुद्दलच फेडता आलं नाही, तर व्याज वाढत जातं. उत्पादन खर्चात त्यामुळं शंभर-दीडशे रुपयांनी वाढ होते. साखर अन्यत्र गोदामं भाड्यानं घेऊन ठेवावी लागली, तर त्याच्या भाड्याचा खर्च वाढत जातो.

अतिरिक्त साखरेच्या उत्पादनातून मार्ग काढण्यासाठी सरकारनं इथेनॉलला प्रोत्साहन दिलं. इथेनॉलचे दर वाढवले. सध्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील वाढीमुळं पेट्रोलच्या किंमती शंभर रुपये लीटरपर्यंत पोचल्या आहेत. डिझेलही नव्वद रुपयांवर पोचलं आहे. सरकारनं उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. महाराष्ट्रात त्यामुळं सुमारे वीस लाख टन साखर उत्पादन कमी होणार आहे. जादा इथेनॉल उत्पादनामुळं कच्च्या तेलाची आयात कमी होऊन परकीय चलनातही बचत करता येते; परंतु सरकारनं निर्णय घेतल्यानंतर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते, की नाही, हे पाहायला हवं. नेमकं तिथंच सरकार चुकतं. केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये मिश्रणाकरिता साखर कारखान्यांमधून उत्पादित होणारं सर्व इथेनॉल आकर्षक दरामध्ये खरेदी करण्याची घोषणा केली. राज्यातील कारखान्यांकडं इथेनॉलचं उत्पादन करण्याची क्षमता आहे; परंतु ते साठवण्याची क्षमता मर्यादित आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी वेळेत इथेनॉल उचललं, तर इथेनॉल साठवणुकीचा मुद्दा पुढं येत नाही; परंतु गेल्या 19 वर्षांचा अनुभव लक्षात घेतला, तर इथेनॉल खरेदीचे करार होतात; परंतु प्रत्यक्षात ते उचललं जात नाही. तेल कंपन्यांकडं इथेनॉलची साठवणूक करण्याची सुविधा नाही. त्यामुळं कारखान्यांना इथेनॉलचं उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. देशाचं कच्चं तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचविण्यासाठी इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आलं. त्याचाच भाग म्हणून सरकारनं पेट्रोलमध्ये 2022 पर्यंत दहा टक्के तर 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता साखर कारखान्यांतून तयार होणारं सर्व उत्पादन खरेदी करण्याचा आदेश चालू गाळप हंगामापासून जारी केला; परंतु इथेनॉल उचललं जात नसल्यानं ते कुठं ठेवायचं, हा गंभीर प्रश्‍न साखर उद्योगापुढं निर्माण झाला आहे.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,770,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1689,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: साखर उद्योगाची कोंडी
साखर उद्योगाची कोंडी
https://1.bp.blogspot.com/-GFIBwsWEDXM/YDo8LNMLh8I/AAAAAAABooM/pkwjfSuKqCgADatngsCcPopIyGtBgIJewCLcBGAsYHQ/s320/New%2BVindo%2Blogo.jpg
https://1.bp.blogspot.com/-GFIBwsWEDXM/YDo8LNMLh8I/AAAAAAABooM/pkwjfSuKqCgADatngsCcPopIyGtBgIJewCLcBGAsYHQ/s72-c/New%2BVindo%2Blogo.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_639.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_639.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content