$type=ticker$snippet=hide$cate=0

घातपाताचा संशय

कर्नाटक आणि सीमांध्रात गेल्या दोन आठवड्यांत जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट होऊन अनेकांचा बळी गेला. सुरुंगासाठी लागणार्‍या जिलेटिनचा कसा गैरवापर...

कर्नाटक आणि सीमांध्रात गेल्या दोन आठवड्यांत जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट होऊन अनेकांचा बळी गेला. सुरुंगासाठी लागणार्‍या जिलेटिनचा कसा गैरवापर होतो, हे वेळोवेळी दिसले आहे. स्फोटक वापरण्याची नियमावली अतिशय कडक असताना कुणालाही कधीही आणि कशीही जिलेटिन मिळतात कशी, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातही दक्षिण मुंबई हा अतिशय गजबजलेला प्रदेश. या भागात कायम कडक बंदोबस्त असतो, तरीही देशातील सर्वांत श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी बेवारसपणे उभी केली जात असताना तेथील सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्‍न निर्माण होतो.  


या स्कॉर्पिओ गाडीत अंबानी यांच्या गाडीच्या क्रमांकासारख्या साधर्म्य असलेल्या अनेक नंबर प्लेट सापडल्या आणि धमकीचे पत्रही सापडले. त्यावरून या प्रकरणाचा कट रचताना अंबानी यांची बारीकसारीक तपशील मिळविला होता. अंबानी यांचे कुणाचेही शत्रुत्त्व नाही, तरीही त्यांना ही धमकी कुणी दिली, कशासाठी दिली, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलिस, सहआयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे. शेतकरी आंदोलकांचा अंबानी यांना असलेला उघड विरोध वगळता अन्य कुणाचाही विरोध असल्याचे आतापर्यंत पुढे आलेले नाही. अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने जरी कारवाई केली, त्या वेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हीआयपी आहे. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असतो. असे असताना तिथे गाडी पार्क केली जाते, तिच्याकडे अनेक तास कुणी फिरकत नाही, हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अंबानी यांना यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे. ही सुरक्षा तीन ते चार पद्धतीत आहे. इतकी सुरक्षा असूनही संबंधित परिसरात अशाप्रकारे गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले आहे. अंबानी यांना याआधी धमकीचे पत्र आले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्या बंगल्यापर्यंत ही सुरक्षा व्यवस्था आहे. सरकारकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. अंबानी यांच्या बंगल्यासमोर उभ्या केलेल्या गाडीत स्फोटकांसोबत धमकीचे पत्रदेखील आढळले. याचा अर्थ कमी कालावधीत अंबानी यांना धमक्यांची दोन पत्रे आली आहेत. हा खोडसाळपणा नक्कीच नाही. विशेष म्हणजे ज्या रोडवर गाडी उभी होती, त्या रस्त्यावर सर्व मंत्री, मोठमोठे उद्योगपती यांची ये-जा असते. मी मुंबई पोलिस आयुक्तांच्या सतत संपर्कात आहे. ती गाडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे. गाडीची नंबरप्लेटवरील नंबर जरी काढला असला, तरी त्याच्या खोलावर जाऊन आम्ही तिथे गाडी सोडणार्‍याला शोधून काढू. हे नेमके कुणी केले? याच्या मुळाशी कोण आहे? ते निश्‍चितपणे शोधून काढू. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास दिलेला आहे. या एका प्रकरणामुळे कुणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आणि महराष्ट्र पोलिस सतत अलर्ट असतात. पोलिस यंत्रणा शंभर टक्के सक्षम आहे. अशा एखाद्या प्रकरणामुळे घाबरण्याचे कारण नाही. आम्ही आणखी कडक बंदोबस्त करु, असे त्यांनी सांगितले असले, तरी याच मुंबईत पूर्वी बाँबस्फोट, दहशतवादी हल्ले झाले आहेत, हे विसरता येणार नाही. संबंधित गाडी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया हाऊस या बंगल्याच्या गेटसमोर आली होती, अशी माहिती समोर आली आहे. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या गाडीशी पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून पोलिसांनी ही गाडी जप्त केली. ही बाब समोर आल्यानंतर येथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो सतर्क झाले आहे. बॉम्बनाशक पथकाने या गाडीची तपासणी केली. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती. हा प्रकार घडल्यानंतर मुंबई पोलिस सतर्क झाले होते. त्यांनी गाडीचा तपास करून गाडीतील सर्व पुरावे गोळा केले आहेत. मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत. सहा लाख 58 हजार चारशे  कोटींच्या संपत्तीसह ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. खास गोष्ट म्हणजे टाळेबंदीनंतरही त्यांची संपत्ती दर तासाला 90 कोटी रुपयांनी वाढली. हुरुनच्या ग्लोबल लिस्टमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे अंबानी पहिले भारतीय आहेत. मुकेश अंबानींची वैयक्तिक संपत्ती गेल्या नऊ वर्षात दोन लाख 77 हजार सातशे कोटी रुपयांनी वाढली. स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवणार्‍यांनी मुकेश अंबानी यांच्या गाडीचा नंबर शोधून तशीच गाडी त्यांच्या बंगल्यासमोर पार्क केल्यामुळे हा पूर्णपणे नियोजित कट असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे. पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ सहा हजार कोटी रुपये आहे. आठ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणारही नाही, असा दावा केला जातो. अँटेलिया इमारचीच्या सहाव्या मजल्यापर्यंत पार्किंग असून त्यात 168 गाड्या पार्क होऊ शकतात. या बंगल्यात भारतीय संस्कृती दाखवणारे मंदिर, मूर्ती यांचा वापर अगदी योग्यरित्या केल्याचे सांगितले जाते. या घराच्या छतावर तीन हेलीपॅड आहेत. घरातच स्वीमिंग पूल आणि स्पा रुमही आहे. तसेच सिनेमागृह, जिम आणि बॉलरुमही आहे. मुकेश अंबानी यांच्याजवळ स्वत:ची एक एअरबसही आहे. अशा गर्भश्रीमंत व्यक्तीच्या घराजवळ स्फोटके भरलेली गाडी आणली जाणे म्हणजे सुरक्षा यंत्रणांना भेदण्याचा प्रकार आहे. जिलेटिनचा स्फोट करण्याबाबतचे नियोजनही संबंधितांनी केले असावे; परंतु त्याअगोदरच सुदैवाने ही माहिती उघड झाली आणि स्फोटके ताब्यात घेण्यात आली, हे चांगले झाले. आता यामागचा सूत्रधार शोधणे महत्त्वाचे आहे. ही गाडी चोरली आहे का, तिचा मालक कोण, बनावट नंबर प्लेट कुठून तयार केल्या, जिलेटिन कुठून मिळविले, ज्याने पुरविले तो परवानाधारक आहे का, याचा शोध आता घ्यावा लागेल. 

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: घातपाताचा संशय
घातपाताचा संशय
https://1.bp.blogspot.com/-gW63h2lgHa4/YDjml2lMVGI/AAAAAAABolw/XaPM3xGBYIcnhIodoly-ytLMlYvf3Kt2QCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-gW63h2lgHa4/YDjml2lMVGI/AAAAAAABolw/XaPM3xGBYIcnhIodoly-ytLMlYvf3Kt2QCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_641.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_641.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content