$type=ticker$snippet=hide$cate=0

मानसिकता बदलाची गरज

जग बदलते. तंत्रज्ञान बदलते. तशी कार्यपद्धतीही बदलायला हवी; सरकारी कार्यपद्धतीत मानसिकता लवकर बदलत नाही. सर्व कामांचे केंद्रीकरण केले जाते. म...


जग बदलते. तंत्रज्ञान बदलते. तशी कार्यपद्धतीही बदलायला हवी; सरकारी कार्यपद्धतीत मानसिकता लवकर बदलत नाही. सर्व कामांचे केंद्रीकरण केले जाते. मंत्रालय हे शेवटचा पर्याय असायला हवा; परंतु अधिकारांचे विकेंद्रीकरण करायला हवे, हेच अधिकार्‍यांना पटत नाही. खरेतर आता तंत्रज्ञानाच्या काळात कोणतेही काम गावपातळीवर व्हायला हवे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत येण्याची गरज भासली नाही, तर मंत्रालयातील गर्दी कमी होईल. जे मंत्रालयाचे तेच कंपन्यांच्या मुख्य कार्यालयांचे. औद्योगिक जगताने फार पूर्वीपासून कामांच्या पाळ्या ठरविल्या आहेत. 


तीन पाळ्यांमध्ये काम चालते. त्यामुळे एकाच वेळी कंपन्यांमध्ये गर्दी होत नाही. कमी यंत्रसामुग्रीवर जास्त काम करून घेतले जाते. कामगारांना आणण्यासाठी त्याच त्या बस वापरल्या जातात. जनरल पाळी (शिफ्ट) फार कमी लोकांची असते. मुख्यतः लेखा आणि पर्सोनेल विभागाचे कामच जनरल पाळीत होते. लोकांची जीवनशैली बदलली आहे. कार्यसंस्कृती बदलली आहे. तिचा विचार करून आता सरकारी आणि अन्य क्षेत्रांनी बदलायला हवे. मुंबईत त्याचा विचार चार दशकांपूर्वीच झाला होता. मुंबईतील नरीमन पॉईंट आणि मंत्रालय परिसरातील सर्व कार्यालये वाशीत आणण्याचा विचार झाला होता. नवीदिल्ली, गांधीनगर, नवी मुंबई, दिल्ली एनसीआर ही विस्तारित शहरे मुळात मुख्य भागातील कामांचे विकेंद्रीकरण करण्यासाठीच होती; परंतु त्याचा मूळ उद्देश बाजूलाच राहिला. वाशीत तर मंत्रालय व अन्य सरकारी कार्यालयांसाठी एक भूखंड राखीव ठेवण्यात आला होता; परंतु नंतर तो बिल्डरांच्या घशात घातला गेला. मुंबईसह बहुतांश शहरात रस्त्यांचे रुंदीकरण झाले. उड्डाणपूल झाले; परंतु वाहनांची गर्दीच इतकी वाढली, की ते सारे कमी पडायला लागले. वाहतुकीची कोंडी कायम झाली. पुणे शहराच्या आजूबाजूने तीस किलोमीटर परिसरात औद्योगिक वसाहती, नागरी संकुले उभी राहिल्याने पुण्याच्या एका भागातून दुसर्‍या भागात जायला जीवावर येते. हे सर्व सांगायचेे कारण सामाजिक अंतर भान पाळणे किती अवघड होत चालले आहे. नागरिकांना स्वयंशिस्तीचे धडे पाळायला सांगणे सोपे असते; परंतु ज्याचे पोट रोजच्या कामावर आहे, त्याला उपाशी मरण्यापेक्षा कोरोेनाने आलेले मरण परवडते. यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोक एकाच वेळी एकत्र कसे येणार नाहीत, हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेळांवर रोजगार उपलब्ध होणे, कामावरून घरी सुरक्षित परतता येईल, अशी दळणवळणाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अनेक पाळ्यांत कामे सुरू झाली, तर वाहतुकीचा ताण कमी होईल. आस्थापनांवरचा खर्च कमी होईल. त्याचबरोबर एकाच वेळी जास्त जागा लागणार नाही. 

परदेशात घरून काम करण्याची संकल्पना यशस्वी झाली आहे. आपल्याकडे आतापर्यंत घरून काम करतो असे कुणी म्हटले असते, तर त्याला वेड्यात काढले गेले असते; परंतु कोरोनाने आपल्याला घरूनही चांगले काम करता येते, हा धडा दिला. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. कोरोनामुळे कार्यालयात जाता येत नसले, तरी घरून काम करता येते, हे त्यातूनच समजले. घरी काही सुविधा दिल्या, तरी चालू शकते, हे त्यातून समजले. गेल्या 11 महिन्यांपासून ते आपल्या अंगवळणी पडले आहे. आता कोरोना पुन्हा डोके वर काढायला लागला आहे. अशा वेळी टाळेबंदी पुन्हा करावी लागू नये, अशा मानसिकतेचे सर्वंच लोक आहेत; परंतु केवळ तशी मानसिकता असून चालत नाही, तर त्यासाठी सरकार आणि लोकांनीही तशी कार्यसंस्कृती तयार केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत आणि पंतप्रधानांसमोर हा विचार बोलून दाखविला. विरोधकांनी त्यावर टीका केली असली, तरी त्यांनी मांडलेला विचार अतिशय महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांत कशारितीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 1992 मध्ये जेव्हा मुंबईत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती, तेव्हा दक्षिण मुंबईतील बहुतांश आस्थापने नव्या मुंबईत आणि कल्याण परिसरात आणता येतील का, यावर विचार झाला होता; परंतु दुर्दैवाने तो अमलात आणला गेला नाही. आता दक्षिण आणि मध्य मुंबई रोजगार देणारी, तर कल्याण, नवी मुंबई राहण्यासाठी उपयुक्त अशी विभागणी झाल्याने सकाळी मुंबईकडे जाणार्‍यांची रीघ, तर संध्याकाळी मुंबईतून बाहेर पडणार्‍यांची गर्दी असे जे चित्र आहे, ते बदलणे आवश्यक आहे. कामाचे केंद्रीकरण होण्याऐवजी विकेंद्रीकरण झाले, तर लोकांच्या गर्दीचेही विकेंद्रीकरण होते. तसे ते करण्याचा प्रयत्न झाला नाही; परंतु आता कोरोनाच्या निमित्ताने का होईना तसे विकेंद्रीकरण करण्याचा विचार होतो आहे, हे ही नसे थोडके. कार्यालयीन वेळांची सकाळी दहा ते सायंकाळी पाच ही मानसिकता बदलण्याच्या गरजेवर ठाकरे यांनी भर दिला. राजपत्रित अधिकारी संघटनेच्या बैठकीतही ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू. ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोना संसर्गाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्‍वासात घेऊन दोन पाळ्यांत मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मंत्रालयात रोजची अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे, हे महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक दोन दिवसांत बाहेरून येणार्‍यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात दररोज येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही, याची खात्री करता येऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या अनुषंगाने यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. हे मंत्रालयाच्या बाबतीतच नाही, तर राज्यांतील सर्वंच सरकारी कार्यालयांत करता येईल का, याचीही चाचणी करण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, ठाणे अशा काही मोठ्या महानगरांत हा प्रयोग राबविणे शक्य आहे का, याचाही अभ्यास करावा लागेल. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या. ग्रामीण भागातील लोक मंत्रालयात मोठ्या संख्येने येतात. बरीचशी कामे असतात; पण त्यांच्यासमोर मंत्र्यांना, अधिकार्‍यांना कसे भेटायचे हा प्रश्‍न असतो. या लोकांना मुंबईत मंत्रालयात हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या वर्षभरात त्याचे काय झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, काही मदत लागेल त्याबाबत तेथील कार्यालयात सांगितल्यानंतर ते कार्यालय मंत्रालयाशी ‘कनेक्ट’ असेल, तेथून थेट लोकांचे प्रश्‍नी मार्गी लावण्यात येतील, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयावर काहीच निर्णय झालेला नाही. 

 

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मानसिकता बदलाची गरज
मानसिकता बदलाची गरज
https://1.bp.blogspot.com/-VKtvjEpCIdw/YDZMmUqKkUI/AAAAAAABokI/LHc-RchY0lQlhUMyXLb5ong4TnyMmHqPgCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-VKtvjEpCIdw/YDZMmUqKkUI/AAAAAAABokI/LHc-RchY0lQlhUMyXLb5ong4TnyMmHqPgCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_648.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_648.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content