मुंबई : मध्य रेल्वेच्या अमन लॉज - माथेरान शटल सेवा पुन्हा सूरू झाल्यापासून ९०,७५३ प्रवाशांची आणि ११,८७९ पॅकेजेसची वाहतूक झाली आहे. मुंबईतील...
मुंबई : मध्य रेल्वेच्या अमन लॉज - माथेरान शटल सेवा पुन्हा सूरू झाल्यापासून ९०,७५३ प्रवाशांची आणि ११,८७९ पॅकेजेसची वाहतूक झाली आहे. मुंबईतील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कोविड अनलॉक कालावधीत पर्यटकांनी येथील नैसर्गिक वातावरणामध्ये विश्रांती घेण्यात काहीच नवल नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी, कुटुंब आणि मित्रांसह एकत्र बसण्यासाठी हे एक योग्य स्थळ आहे.
टॉय ट्रेनमधून आल्हाददायक प्रवास करण्यासाठी आणि सप्ताहअखेर माथेरानमध्ये घालवण्यासाठी या गाड्यांतील १०७० तिकिटे दि. १२.२.२०२१ रोजी बुक करण्यात आली. दि. ४.११.२०२० रोजी सुरू झालेली आणि माथेरान या गंतव्यासाठी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या सेवा हळूहळू ४ वरून १४ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. पर्यटनस्थळ आणि निसर्गाच्या सान्निध्यातील या लोकप्रिय ठिकाणी, शटल सेवा देऊन रेल्वे नी या परिसराला एक नवीन रूप दिले आहे. संस्मरणीय प्रवासासह निसर्गाला जवळून पाहण्याचा रोमांच टॉय ट्रेन प्रदान करते आणि अशा प्रकारे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या तीव्रतेत स्वतःला समर्पित करते. या सेवा पर्यटकांना आरामदायक, स्वस्त आणि जलद वाहतुकीस मदत करतात. या पर्यटनस्थळी येणा-या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करण्यात रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत आहे आणि माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभारही लागत आहे.