मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ईडीने खडसेंविरोधात...
मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ईडीने खडसेंविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. आता 17 तारखेपर्यंत ईडी खडसे यांच्याविरोधात कोणताही कारवाई करू शकणार नाही.
या याचिकेवर आज सुनावणी पार पडली; मात्र खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याने त्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यामुळे खडसे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी होईपर्यंत खडसे यांना सरंक्षण मिळणार आहे. यावर सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही.