युवक काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध कराड / प्रतिनिधी : अक्क बक्कड डिझेल नब्बे... पेट्रोल सौ, सबका साथ .. विश्वासघात, वाह रे मोदी तेरा खेल ...
युवक काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध
कराड / प्रतिनिधी : अक्क बक्कड डिझेल नब्बे... पेट्रोल सौ, सबका साथ .. विश्वासघात, वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल, कहाँ गये.. कहाँ गये अच्छे दिन, नही चलेंगी.. नही चलेंगी तानाशाही नहीं चलेगी, मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत कराड येथे युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केले.
कराड येथील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ युवक काँग्रेसकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप मार्गावर फेरी काढण्यात आली. यावेळी युवक काँग्रस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, कराड उत्तर अध्यक्ष अमित जाधव, अभिजीत पाटील, नगरसेवक राजेंद्र माने,डॉ. इंद्रजित गुजर, कराड दक्षिण अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, प्रवक्ते दिग्विजय सुर्यवंशी, अमीर आत्तार, अतुल थोरात, विवेक चव्हाण, राहूल थोरात, प्रशांत यादव, विक्रम पाटील, प्रकाश पिसाळ, शुभम लादे, विरेंद्र सिंहासने यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवराज मोरे म्हणाले, राज्यातील जिल्हा, तालुका पातळीवर युवक काँग्रेसचे पेट्रोल- डिझेल या दरवाढी विरोधात आंदोलन चालू आहेत. डिझेल- पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, अरूण जेटली या भाजपच्या नेत्यांनी देशात रान पेटवले आणि पेट्रोल- डिझेलचे भाव 35- 40 रूपये पर्यंत करू म्हणून आंदोलन केले. मात्र आज डिझेल 90 तर पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे मजूर, छोटे व्यापारी, शेतकरी हे वर्षभर त्रस्त झालेले आहेत. अशा काळात पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढीचा आम्ही निषेध करत आहे.