कराड / प्रतिनिधी : बेलदरे, (ता. कराड) या गावाला जाणार्या बस वेळेत जात नाहीत. कधी उशिरा तर कधी लवकर किंवा अचानक बस फेरी रद्द केली जात होती. ...
कराड / प्रतिनिधी : बेलदरे, (ता. कराड) या गावाला जाणार्या बस वेळेत जात नाहीत. कधी उशिरा तर कधी लवकर किंवा अचानक बस फेरी रद्द केली जात होती. यामुळे याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनीना बसत होता.
याबाबतची तक्रार विद्यार्थिनींनी आगारातील कर्मचारी वर्गाकडे केल्यानंतर त्यांना उध्दटपणे उत्तरे मिळत होती. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी ही परिस्थिती हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष तुषार उर्फ गणेश पाटील यांना सांगितली. त्यानंतर आज शुक्रवारी हिंदू एकतेचे पदाधिकार्यांनी व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक मोरे यांची भेट घेतली. बस वेळेत सोडण्याबाबत व उध्दटपणे बोलणार्या कर्मचारी यांना ताकीद देण्याबाबतची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. यानंतर व्यवस्थापकांनी यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर परिस्थिती अशीच राहिली तर जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू एकतेच्या पदाधिकार्यांनी दिला.
यावेळी हिंदू एकतेचे उपजिल्हाध्यक्ष रूपेश मुळे, तालुकाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष भूषण जगताप, कराड उत्तर संघटक नानासाहेब पिसाळ, केदारनाथ ग्रुप अध्यक्ष अजित जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.