कराड / प्रतिनिधी : शासन कृषी विभागामार्फत शेणोली व कार्वे येथे शेतकरी शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम झाला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ...
कराड / प्रतिनिधी : शासन कृषी विभागामार्फत शेणोली व कार्वे येथे शेतकरी शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम झाला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भात परिक्षेत्रावर हरभरा लागवड ही योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना हरभरा पिकावर होणार्या रोग व किडीच्या प्रादुर्भावाची माहिती प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन देण्यात आली.
या शेतकरी शास्त्रज्ञ भेटीवेळी कडेगाव कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. विजय पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हरभरा पिकावर येणार्या मर व घाटआळी या रोगाबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. घाटआळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याची उभारणी याबाबतचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना शेतावर दाखविण्यात आले.
यावेळी सैदापूर मंडलचे मंडल कृषी अधिकारी विनय कदम यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक पंडीत मोरे, कृषी सहाय्यक हेमंत धापते, विक्रम नलवडे, शेणोलीचे प्रगतशील शेतकरी सुनिल शामराव कणसे, सागर रामराव कणसे, किसन कणसे, शंकर पाटील, संतोष कणसे, अंकुश कणसे, सुहास कणसे व कार्वे येथील शेतकरी महादेव पाटील, दिपक थोरात, पोपट हुलवान तसेच शेतकरी उपस्थित होते.