$type=ticker$snippet=hide$cate=0

परिणाम माहीत असताना पुन्हा टाळेबंदीचाच विचार

एकदा ठेच लागली, की माणसं पुढचं पाऊल जपून टाकतात. रस्त्यात कुठं दगड किंवा अन्य काही पडलेलं नाही ना, ते पाहिलं जातं. खरं तर सरकारला आता त्याची...



एकदा ठेच लागली, की माणसं पुढचं पाऊल जपून टाकतात. रस्त्यात कुठं दगड किंवा अन्य काही पडलेलं नाही ना, ते पाहिलं जातं. खरं तर सरकारला आता त्याची जाणीव असायला हवी; परंतु अनुभवातून सरकार शिकायला काहीच तयार नाही. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा वेगानं प्रसार होतो. त्यामुळं त्याचा प्रसार रोखायला हवा. कोरोनावर मात करण्यासाठी स्वयंशिस्त असायलाच हवी; परंतु स्वयंशिस्तीनं ऐकलं जाणार नसेल, तर मग कायद्याचा बडगा उगारायला काही हरकत नाही.

भारतात कोरोनाची लागण झालेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. टाळेबंदी लागू होऊन 11 महिने झाले. तिच्या परिणामातून बाहेर पडलो नाही, तोच आता पुन्हा टाळेबंदीची चर्चा सुरू झाली आहे. टाळेबंदीच्या परिणामांची किंमत जगाला मोजावी लागली. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. महायुद्धापेक्षाही जास्त लोकांचा बळी गेला. लाखो कोटी रुपयांची पॅकेज द्यावी लागली. सरकारांचा महसूल घटला. कल्याणकारी योजनांना खीळ बसली. विकासासाठी पैसेच राहिले नाहीत. असं असताना मुख्यमंत्र्यांसह सर्वंच मंत्री टाळेबंदीची जबाबदारी जनतेवर सोडून मोकळे होत आहेत. टाळेबंदीच्या जगावर झालेल्या परिणामांची चिकित्सा वेगवेगळ्या अहवालांत करण्यात आली. थेट हातातोंडाच्या गाठीभेटीशी टाळेबंदीचा संबंध असल्यानं ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांना टाळेबंदीची केवळ चर्चाच पोटात भीतीचा गोळा निर्माण करते. न्यूझीलंड, तैवानासारख्या देशांनी टाळेबंदी न करता कोरोनावर मात केली. जादा चाचण्या, सामाजिक अंतर भान, वैयक्तिक स्वच्छता, मुखपट्टींचा वापर आदींवर भर देणं राहिलं बाजूला. पुन्हा पुन्हा टाळेबंदीचा गजर केला जात आहे. त्याच्या परिणामांची माहिती असतानाही तोच मार्ग पुन्हा पुन्हा अनुसरण्याची भाषा का केली जात आहे, याचं उत्तर मिळत नाही. स्वयंशिस्तीचा वारंवार पाढा वाचूनही लोक ऐकायला तयार नसतील, तर त्यांना कारवाईची भाषा समजते. ती करायला हरकत नाही. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज आठ हजारांहून अधिक बाधित आढळत आहेत. मंत्र्यांसह नेतेच शक्तीप्रदर्शन करायला लागले, तर लोकांनी काय करायचं, हा प्रश्‍न निर्माण होणं स्वाभावीक आहे. कोरोना हा व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो समाजाला घातक ठरतो. त्यामुळं सामाजिक परिणामांची जाणीव ठेवून कोरोना नियंत्रण करायला हवं. लस घेतली, म्हणजे कोरोनामुक्त झालो असं नाही. त्यानंतरही मुखपट्टीसह सर्व कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. तसंच केवळ एक डोस घेतल्यानं कोरोना आपल्या जवळपासही फिरकणार नाही, हा जो समज आहे, तो अगोदर दूर करायला हवा. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनामुक्तीचा मार्ग सुकर होतो; परंतु एक डोस घेतल्यानंतर ही कोरोना कसा झाला, असं विचारणार्‍यांचं अज्ञान त्यातून दिसतं. राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता अधिकच झपाट्यानं वाढताना दिसत आहे. त्याची थेट केंद्र सरकारलाच दखल घ्यावी लागली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पथक मदतीसाठी तयार ठेवलं आहे. कोरोनामुळं होणार्‍या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात आठ हजार 333 नवे बाधित वाढले असून, 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.43 टक्के एवढा आहे. आज चार हजार 936 जण कोरोनातून बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.35 टक्के आहे. पूर्वी हेच प्रमाण 97.5 टक्के होतं. आजपर्यंत राज्यात एकूण 20 लाख 17 हजार 303 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 67 हजार 608 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी 61 लाख 12 हजार 519 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21 लाख 38 हजार 154 (13.27 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात तीन लाख 18 हजार 707 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर दोन हजार 688 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाची लस आली असली, तरी वाढत्या कोरोनाच्या फैलावाला आवर घालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येण्याचा हा सलग तिसरा दिवस होता. येथे अ‍ॅेक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 दिवसांमध्ये दुप्पट झाली आहे. शनिवारी हा आकडा 67 हजार 608 एवढा झाला. 11 फेब्रुवारीला हा आकडा 30 हजार 265 एवढा होता. महाराष्ट्रानं पुन्हा एकदा केरळला मागं टाकलं आहे. आता केरळमध्ये 51 हजार 390 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबईत लोकलच्या फेर्‍याही कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. उपाययोजना सुरू असल्या, तरी त्याचा रिझल्ट काय येईल, हे आज सांगता येत नाही. मुंबईत सर्वांत मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज धारावीत 16 कोरोना रूग्ण मिळाले असून येथील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे. आतापर्यंत एक अंकी संख्येत रूग्णवाढ होत होती; पण आज रुग्ण संख्या दोन अंकी झाली आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. धारावीसारख्या भागात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ निश्‍चितच चिंता वाढवणारा आहे. राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईसह इतर शहरातदेखील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसांत तब्बल 55 हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. एकीकडं कोरोनाचे वाढते रूग्ण आणि दुसरीकडं बरं होणार्‍यांची संख्या मर्यादित झाल्यानं राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 67 हजारांवर पोहचली आहे. वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यात टाळेबंदी सुरू असून मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरातही विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू आहे. एकीकडं बाधितांचा आलेख वाढत असताना बरं होणार्‍यांचे प्रमाण मात्र स्थिर आहे. आज चार हजार 936 जण कोरोनातून बरे झाले. देशात सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारी कोरोनाचे 16 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यामुळं कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी दहा लाख 63 हजार झाली असून, त्यापैकी एक कोटी सात लाख 50 हजार लोक बरे झाले आहेत. एक लाख 55 हजार रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातून गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर राज्यात मोठया प्रमाणावर उद्योग बंद पडले तसंच बेरोजगारी वाढल्याचं ‘संपर्क’ या संस्थेनं केलेल्या पाहणीत आढळून आलं. रस्ते, पाणी, पायाभूत सुविधांपेक्षा आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर प्रथमच राज्यातील आमदारांनी भर दिला आहे. ‘संपर्क’या संस्थेनं विधानसभेतील आमदारांना प्रश्‍नावली पाठवून त्यांचा प्राधान्यक्रम, वर्षभरात आलेले अनुभव याचा आढावा घेतला. आमदारांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार, टाळेबंदीमुळं कारखाने मोठया प्रमाणावर बंद पडले. स्थावर मालमत्ता क्षेत्र ठप्प झालं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं आढळलं. टाळेबंदीमुळं निर्माण झालेल्या बेरोजगारीची अधिकृत माहिती केंद्र व राज्य सरकारकडं उपलब्ध नाही; परंतु राज्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 78 टक्के उद्योग बंद पडले, तर बेरोजगारीत 72 टक्के वाढ झाल्याचा दावा या संस्थेनं केला. ही बाब महाराष्ट्रासाठी फारच हानीकारक असून, त्याचा राज्याच्या एकूणच आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारा आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षांत एकूण तरतुदीच्या 33 टक्केच रक्कम विकासकामांना उपलब्ध होईल. उद्योगबंद पडणं, विकास कामांवर झालेला परिणाम या सार्‍यातून चक्रवाढ पद्धतीनं बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली गेली आहे, असं या पाहणी अहवालाचे समन्वयक शार्दूल मणुरकर यांनी सांगितलं. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाकडं दुर्लक्षच होत असे. रस्ते, पाणी, गटारे, नाले बांधणी किंवा अन्य पायाभूत सुविधांना आतापर्यंत आमदारांचं प्राधान्य असायचं. कारण पुढील निवडणुकीत मतांचं गणित जुळण्याकरिता लोकांना खूश करण्यासाठी आमदारांकडून या कामाचं भांडवल केलं जातं. कोरोनानंतर आमदारांचा प्राधान्यक्रम बदलल्याचं या पाहणीत आढळले. या पाहणीत प्रतिसाद दिलेल्या आमदारांपैकी 75 टक्के आमदारांनी आरोग्य सेवेतील सुधारणा ही पुढील निवडणुकीपूर्वी प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं. आरोग्य विभागातील अपुरं मनुष्यबळ वाढविण्याची भूमिका बहुतांशी लोकप्रतिनिधींनी मांडली. 75 टक्के  आमदारांचं आरोग्यसेवेला प्राधान्य आहे. 71 टक्के  आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा आदी विकासकामांना प्राधान्य असल्याचं मत नोंदविलं. कोरोनामुळं मतदारसंघातील कामं ठप्प झाल्याचं 91 टक्के आमदारांचं मत नोंदविलं. 63 टक्के मतदारसंघांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त होता आणि आरोग्यसेवा अपुरी पडली. 54 टक्के आमदारांनी आरोग्यसेवेतील त्रुटीत प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याची चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे विकासकामांवरील निधीत कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे 52 टक्के आमदारांनी समर्थन केलं, तर 48 टक्के आमदारांनी विरोध केला.

Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: परिणाम माहीत असताना पुन्हा टाळेबंदीचाच विचार
परिणाम माहीत असताना पुन्हा टाळेबंदीचाच विचार
https://1.bp.blogspot.com/-QSnYlKuePkA/YDo7tQ7DyEI/AAAAAAABon8/fpTV1lSpzoEJpyZalIHz0FSU1MND1Q7QgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-QSnYlKuePkA/YDo7tQ7DyEI/AAAAAAABon8/fpTV1lSpzoEJpyZalIHz0FSU1MND1Q7QgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_698.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_698.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content