शिराळा / प्रतिनिधी : चरण, ता. शिराळा येथील बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. तशी जागा ही आहे. मात्र, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून आज ...
शिराळा / प्रतिनिधी : चरण, ता. शिराळा येथील बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. तशी जागा ही आहे. मात्र, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून आज अखेर प्रयत्न होत नसल्याने आणि लोकांचीही मानसिकता नसल्याने दर गुरुवारी भरणारा येथील आठवडी बाजार आता रस्त्यावर भरु लागला आहे. याकडे कुणाचेही लक्ष्य गेलेले नाही की कुणी यावर एक शब्द ही बोलत नाही. किल्ल्याच्या सभोवताली वसविलेले चरण हे गाव आहे. सन 1954 मध्ये स्वा. सैनिक स्व. बाबूराव दादा चरणकर आणि त्यांच्या बरोबर सहकार्यांनी हा बाजार सुरु केला. काही वर्षातच हा बाजार परिसरात नावारुपाला आला. त्यानंतर याच गावात जनावरांचा बाजार ही भरु लागला. यासाठी चरणकर दादा यांनी आपली स्वतःची जागा देऊ केली. सोयी-सुविधा निर्माण करुन दिल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेकडो जनावरे येथे खरेदी-विक्री साठी येत असतात.
सद्या कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद झाला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा येथील आठवडा बाजार सुरु झाला आहे. त्यातच सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वारणा नदी वरील चरण-सोंडोली दरम्यानचा पुल बांधला गेल्याने चरणचे रूपच पालटले आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या आवारात भरणारा गुरुवारचा आठवडी बाजार या पुलामुळे वाढला असून तो अर्धा राज्य मार्गावर भरु लागला आहे. तर अर्धा बाजार ग्रामपंचायत परिसरात आहे. मात्र, कायम स्वरूपी बाजार पठेत असलेल्या दुकानदारांच्या दारातच हा बाजार भरत असल्याने याचा नाहक त्रास या व्यापारी वर्गाला होत आहे.
रस्त्यावर भरणार्या बाजारासाठी पर्यायी जागा म्हणून ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस थोडा वाढविता येईल अथवा वाडीवर जाणार्या रस्त्यावर पर्यायी जागा आहे. तसेच जनावरांचा बाजार बंद झाल्याने ही जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, बाजारासाठी नवीन जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लोकांची उदासीनता बनल्यामुळे चरण येथील व्यापारी यांनी राज्य मार्गावर सुरु केला असून शेतकरी, व्यापारी ग्राहक, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.