चमौली : उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात रविवारी सकाळी धौली नदीत हिमकडा कोसळल्याने महापूर आलाय. या दुर्घटनेत पाण्याचा प्रव...
चमौली : उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात रविवारी सकाळी धौली नदीत हिमकडा कोसळल्याने महापूर आलाय. या दुर्घटनेत पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढल्यामुळे अनेक लोकं बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान नदी काठच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला असून बचाव कार्य सुरू करण्यात आलेय. दुर्घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
अजूनही काही ठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात प्रचंड हिमस्खलन झालंय. यामध्ये अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हा प्रशासनाला आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये. सरकार योग्य पावलं उचलत असल्याची माहिती रावत यांनी दिली आहे.