पुणे / प्रतिनिधी: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भ...
पुणे / प्रतिनिधी: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर आता पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ज्यांना आपले स्वतःचे गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावे लागते, अशा लोकांबद्दल मी बोलायचे का, असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला. न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावरही पवार यांनी भाष्य केले. पुण्यात सुरू असलेल्या ’खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवालक त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शनिवारी केलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे. हे विधान म्हणजे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना, याचाही विचार व्हावा; परंतु या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचेही ते म्हणाले. देशातील न्यायव्यवस्था किती उच्च आहे, असे गेल्याच आठवड्यात न्यायाधीशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.