$type=ticker$snippet=hide$cate=0

पिकांना एमएसपी कायम राहील- पंतप्रधान

 नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यातही पिकांना मिळणारा हमीभाव (एमएसपी) कायम राहिल अशी ग्वाही खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोज्यसभ...

 नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यातही पिकांना मिळणारा हमीभाव (एमएसपी) कायम राहिल अशी ग्वाही खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोज्यसभेत दिली. नव्या कृषी कायद्यांमुळे पिकांना हमी भाव मिळणार की, नाही याबद्दल साशंकता असताना पंतप्रधान मोदींनी हमी भाव कायम राहील, असे आश्वासन दिले. तसेच कृषी कायद्यावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले की, "एमएसपी होता, एमएसपी आहे आणि भविष्यातही एमएसपी कायम राहिल. गरीबांना परवडणाऱ्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले जाईल. मंडींचे आधुनिकीकरण केले जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, कृषीमंत्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बोलत आहेत. चिंतेची स्थिती नाही. या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करतो. परंतु, मुद्दा सोडवण्यासाठी पाऊल पुढे टाकले पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले. कृषी सुधारणांवर विरोधी पक्षाच्या घुमजाववर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत आहे याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे हे ही सांगणे महत्वाचे होते, असेही मोदी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी कृषी धोरणासंदर्भातील मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. मुळ मुद्यावर बोलण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसे आहे. आंदोलकांसोबत काय होतेय. पण, मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगले झाले असते. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी केलेले कौतुक आणि सूचनांसाठी आभार व्यक्त केलेत. भारताने जिंकली कोरोना विरोधातील लढाई यावेळी कोरोना संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, करोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचं श्रेय कोणत्याही सराकरला किंवा एखाद्या व्यक्तीला जात नसून ते भारताला जाते. भारताच्या या करोनाविरुद्धच्या लढाईबद्दल सर्वांना गर्व असला पाहिजे आणि या गोष्टीबद्दल आत्मविश्वासाने बोलणे गरजेचे आहे असेही मोदी म्हणाले. संपूर्ण जग आज वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत आहे. मानवावर अशाप्रकारचे संकट येईल, अशा संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागेल असा विचार आपण कधीच केला नव्हता. मात्र या सर्व संकटांवर मात करुन आपण यशस्वीपणे एक आदर्श निर्माण केल्याचे मोदींनी सांगितले. आंदोलनजीवींपासून सावध रहावे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली. श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे कुणाचेही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवे. त्यामुळे देशानं अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवे असे पंतप्रधानांनी सांगितले. शिख समाजाचे कौतुक पंतप्रधानांनी यावेळी शीख समाजाचे कौतुक केले. ते म्हणाले की, शिखांनी जे योगदान दिले, त्याचा भारताला अभिमान आहे. शीख समाजाने देशासाठी भरपूर काही केलं आहे" असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुरु साहिब यांचे शब्द आणि आशिर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत, असे मोदींनी सांगितले. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते, त्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, त्याचा कोणालाही फायदा होणार नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. परदेशी टीकाकारांना प्रत्युत्तर शेतकरी आंदोलनावरून भारतीय लोकशाहीवर टीकास्त्र सोडणाऱ्यांचा पंतप्रधानांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, जे लोक आमच्या लोकशाहीवर शंका घेतात किंवा भारताच्या या मुलभूत शक्तीवर ज्यांना शंका आहे त्यांना मी विशेष आग्रहाने सांगेन की त्यांनी भारताची लोकशाही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भारताची लोकशाही ही कोणत्याही प्रकारे पाश्चिमात्य संस्था नाही, तर ती एक मानवी संस्था आहे. भारताचा इतिहास लोकशाही संस्थांच्या उदाहरणांनी भरलेला आहे. प्राचीन भारतात 81 गणराज्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो आज भारताच्या राष्ट्रवादावर चहुबाजूने होणाऱ्या हल्ल्यांपासून देशवासियांना सावध करणं गरजेचं आहे. भारताचा राष्ट्रवाद हा संकीर्ण, स्वार्थी आणि आक्रमकही नाही. हा सत्यम शिवम सुंदरमंच्या मुल्यांनी प्रेरित आहे, असे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पिकांना एमएसपी कायम राहील- पंतप्रधान
पिकांना एमएसपी कायम राहील- पंतप्रधान
https://1.bp.blogspot.com/-XzQj8zzdrKQ/YCE7toET_bI/AAAAAAABoDA/pCsbCvhJOkc2mwbS8yPuVr95cndhSnnaACLcBGAsYHQ/s320/Narendra%2BModi.jpg
https://1.bp.blogspot.com/-XzQj8zzdrKQ/YCE7toET_bI/AAAAAAABoDA/pCsbCvhJOkc2mwbS8yPuVr95cndhSnnaACLcBGAsYHQ/s72-c/Narendra%2BModi.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_736.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_736.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content