चाकण/प्रतिनिधीः तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असलेले पोलिस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना भर चौकात घड...
चाकण/प्रतिनिधीः तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असलेले पोलिस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना भर चौकात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे करवंदे जागीच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
रवींद्र करवंदे हे त्यांचे कर्तव्य बजावत असतानाच शनिवाा
री दुपारच्या सुमारास तळेगाव चाकण चौकात पाहतूक कोंडी झाली होती. त्यांनी आरोपीचा कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितले. त्यामुळे पोलिस आणि आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा राग मनात तिघांनी दुचाकीवरुन येत करवंदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी रोहित साळवी आणि हर्षदीप कांबळे अशी आरोपीची नावे असून ते कल्याणचे आहेत. या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा-3 च्या पथकाने अटक केली आहे.