मुंबई/प्रतिनिधीः महाराष्ट्रात पुन्हा एका कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. विदर्भात रुग्णवाढीचा वेग मोठा असला, तरी गेल्या दोन-तीन दिवसांत मु...
मुंबई/प्रतिनिधीः महाराष्ट्रात पुन्हा एका कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. विदर्भात रुग्णवाढीचा वेग मोठा असला, तरी गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईतही रुग्णही वाढू लागले आहेत. याची दखल घेत मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नवे नियम गुरुवारी जाहीर केले. त्यात भर घालत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार इथून पुढे मुंबईत घरातील विलगीकरण बंद करून केवळ संस्थात्मक विलगीकरण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केेले
. यापुढे लक्षण विरहित लोकांनासुद्धा गृह विलगीकरणात ठेवण्यत येणार नाही. प्रत्येकाला कोविड सेंटरमध्ये जावे लागेल, असे महापौरांनी स्पष्ट केले. सर्व सार्वजनिक कार्यक्रम आजपासून बंद करत असल्याचेही महापौरांनी जाहीर केले. लग्न समारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसे दिसली, तरी कारवाई होईल. कुणीही सामाजिक अंतर भानाचे किंवा मुखपट्टी वापरण्याचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होईल, हे याअगोदरच मुंबईच्या आयुक्तांनी जाहीर केले आहे. चहल यांनी दिलेल्या नियमांच्या यादीत वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणार्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले होते; पण त्यापुढे जात महापौरांनी पत्रकार परिषदेत मुंबईत गृह विलगीकरण नाहीच, असे जाहीर केले.