पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील श्री वाजुबाई देवीचा 26 ते 28 दरम्यान होणारा यात्रा उत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे...
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील श्री वाजुबाई देवीचा 26 ते 28 दरम्यान होणारा यात्रा उत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
पाटण तालुक्यातील गोजेगाव येथील वाजुबाईची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. यात्रेसाठी पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या विविध विविध भागातून व कानाकोपर्यातून भाविक मोठ्या प्रमाणात आपल्या सासनकाठ्या घेऊन येतात. यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होते. मात्र, राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून यावर्षी 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दिवसात भरणारी श्री वाजुबाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा संयोजन कमिटीने घेतला आहे. तरी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकच्या कानाकोपर्यातून येणार्या भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन गोजेगाव येथील यात्रा कमिटीने केले आहे.