$type=ticker$snippet=hide$cate=0

बुडत्या जहाजाचा कप्तान

काँग्रेसची अवस्था पक्षाच्या स्थापनेपासूनच्या 135 वर्षांच्या इतिहासात कधी नव्हे, एवढी वाईट झाली आहे. देशावर ज्या पक्षाने पाच दशके राज्य केले,...


काँग्रेसची अवस्था पक्षाच्या स्थापनेपासूनच्या 135 वर्षांच्या इतिहासात कधी नव्हे, एवढी वाईट झाली आहे. देशावर ज्या पक्षाने पाच दशके राज्य केले, त्या पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणे तेवढे सोपे नाही. महाराष्ट्रात तर हा पक्ष गेल्या दोन तपांपासून कधी तिसर्‍या, तर कधी चौथ्या क्रमांकावर असतो. जनतेशी नाळ तुटली. कार्यकर्ते सैरभैर झाले. संघटनात्मक बांधणी फारशी नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविणे हे दिवास्पन आहे. 

पक्षाला केवळ आक्रमक प्रदेशाध्यक्ष असून चालत नाही, तर त्याचे सहकारीही तेवढयाच ताकदीचे असावे लागतात. जनतेने ज्यांना नाकारले, त्यांना संघटनेत महत्त्वाचे स्थान दिल्याने संघटनेला उर्जितावस्था येत नसते. त्यातच राज्याचा संघ निवडताना कप्तानाला जे पाहिजे, ते सहकारी निवडता आले पाहिजेत; परंतु दिल्लीतून सहकारी पाठवायचे आणि खराब झालेल्या खेळपट्टीवर खेळायला लावायचे, याला काही अर्थ नसतो. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा संयमी, संयत आणि सर्वांशी जुळवून घेतलेला कप्तान काँग्रेसमधील काहींना नको होतो, यावरून पक्षात अजूनही कशी बेदिली आहे, हे स्पष्ट होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहता ल्यास काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. पटोले हे कुणबी (ओबीसी) समाजातून येतात आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर ते आक्रमक आहेत. प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेत पराभूत करून ’जायंट किलर’ ठरलेले नाना, मोदी हे शेतकरीविरोधी असल्याची टीका करत ऐन सत्तेतल्या भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये परतणारे नाना, नितीन गडकरी यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर घाम फोडणारे नाना... अशा विविध अंगांनी पटोले यांची महाराष्ट्राला ओळख आहे. ते लढाऊ आणि आक्रमक आहेत. कुणालाही शिंगावर घेण्याची त्यांची तयारी आहे. महाराष्ट्र ते पिंजून काढतील, यातही काही शंका नाही; परंतु तेवढ्याने गलितगात्र संघटनेत प्राण फुंकले जाणार का, हा खरा प्रश्‍न आहे. पटोले हे आता 57-58 वर्षांचे आहेत. राजकारणात ज्या वयात महत्त्वाची पदे मिळतात, ते पाहता ते काही फार वयस्कर आहेत, असे म्हणता येत नाही. राजकीय वयाच्या तुलनेने त्यांना तरुणच म्हणता येईल. त्यांच्या या ’राजकीय तरुणपणा’ला आक्रमकतेची जोड आहे. पटोले हे भाजपमधून स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतल्यानंतर महाराष्ट्र भाजपलाही शेतकरी प्रश्‍नांवरून धारेवर धरले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’महाजनादेश’ यात्रा काढली, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी पटोले यांनी ’महापर्दाफाश’ यात्रा काढली होती. पटोले यांनी केलेली एक टीका खूपच चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेदरम्यान पटोले म्हणाले होते, की भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्‍न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्‍वासने देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत. त्यांची ही टीका पक्षाला किती उपयोगी पडली, हा संशोधनाचा भाग आहे.

नानांमधील आक्रमक चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. या आक्रमक चेहर्‍याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याआधीचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे व्यक्तिमत्त्व मवाळ होते, त्या तुलनेत तर नानांचे व्यक्तिमत्त्व अधिक आक्रमक असल्याचे काँग्रेसजनही मान्य करतात. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी सर्वोच्च न्यायालयात असला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून तो बाजूला सारला गेला नाही. वेळोवेळी भाजपकडून सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरले जाते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे विविध समाजांचे विविध पक्षांकडे झुकण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. किमान ’नेरेटिव्ह’च्या पातळीवर तरी. राष्ट्रवादीची आधीच प्रतिमा ही ’मराठावादी’ आहे. भाजपची वाढच मुळात ओबीसी समाजाच्या पाठबळावर अधिक झाली आहे. आजच्या स्थितीला भाजप जेवढे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असे राजकीय विश्‍लेषकांना वाटते. या पार्श्‍वभूमीवर ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बिथरलेल्या ओबीसी समाजाला काँग्रेस हा पर्याय वाटणे सहाजिक आहे. त्यात प्रदेशाध्यक्षही ओबीसी समाजातील असल्यास हा मार्ग अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी पटोले यांनी ओबीसी समाजात आपली प्रतिमा ’आपला नेता’ म्हणून तयार केली आहे. भाजप शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना गांभीर्याने घेत नाही, असा पटोले यांचा आरोप आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टीचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता व्यक्तहोत आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावे पुढे आली. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भात मिळाले. एकेकाळी विदर्भा हा काँग्रेसचा गड मानला जात असे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदे दिली. आता प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. विदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसने केलेला प्रयत्न म्हणूनही पटोले यांच्याकडे पाहिले जाऊ शकते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे एकास एक दिग्गज नेते असल्याने पटोले हे त्यांना कसे सोबत घेऊन जातात आणि बेरजेचे राजकारण करतात, हे आगामी काळात कळेलच. काँग्रेसचे जे सहा विभागाचे कार्याध्यक्ष नेमण्यात आले, त्यात प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळता अन्य नेत्यांना जनतेने नाकारले आहे. सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वत:च्या रक्तानं पत्र लिहित काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे याविषयी न्याय मागितला होता. त्यामुळे मग प्रणिती शिंदे यांना पक्षाने दिलेले कार्याध्यक्षपद ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. नाराजांची पक्षसंघटनेवर वर्णी लावून पक्ष वाढत नसतो. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रणिती शिंदे या मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाजीराव मोघे यांचा अलीकडच्या पिढीशी काय संबंध? भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. विधानसभेला पराभव आणि विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने हंडोरे पक्षावर नाराज होते. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या विचारात होते; परंतु हंडोरे यांचे संभाव्य पक्षांतर रोखण्यास काँग्रेसला यश आल्याचे मानले जाते. हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. पटोले यांना राज्यातील कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार कितपत आहे, हा प्रश्‍नच आहे. त्यात कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष पक्षाने दिल्लीवरून पाठविल्याने पटोले यांना संघ निवडीचा फार कमी वाव आहे. अशा परिस्थितीत ते पक्षाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसे करणार, हे काँग्रेस आणि पटोलेच जाणोत. 


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बुडत्या जहाजाचा कप्तान
बुडत्या जहाजाचा कप्तान
https://1.bp.blogspot.com/-PMWZoLBHm9I/YB6dv_s12II/AAAAAAABn-s/6FvWC8KdmF80L0N05SCPij7VvG-Vx5a2gCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-PMWZoLBHm9I/YB6dv_s12II/AAAAAAABn-s/6FvWC8KdmF80L0N05SCPij7VvG-Vx5a2gCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_758.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_758.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content