$type=ticker$snippet=hide$cate=0

कबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रो कबड्डी, महा कबड्डीने कबड्डी खेळास घरा-घरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दि...


इस्लामपूर / प्रतिनिधी :
प्रो कबड्डी, महा कबड्डीने कबड्डी खेळास घरा-घरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जयंत कबड्डी लीगमध्ये खेळणार्‍या खेळाडूंनाही तसेच व्यावसायिक व्यासपीठ मिळताना या लीगमधून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील, असा विश्‍वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर येथील जयंत स्पोर्ट्सने ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय जयंत कबड्डी प्रीमियर लीगचे ना. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव, सांगली जिल्हा कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, पुणे जिल्हा उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने प्रामुख्याने उपस्थित होते. सांगली जिल्हा कबड्डी असाशिएशनच्या मान्यतेने पाच दिवस चालणारी लीग घेतली आहे.

ना. पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून वाळवा तालुक्यात कबड्डी खेळ खेळला जात असून नितीन मदने सारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. या कबड्डी लिगमधून तालुक्यातील खेळाडूंना निश्‍चितपणे प्रोत्साहन मिळणार आहे. आय पीएलवर काही मंडळी टीका करतात. मात्र, देशातील क्रिकेट खेळाडूंना यातून मोठे प्रोत्साहन मिळाल्याचे नाकारता येत नाही.

प्रारंभी सर्व खेळाडू, संघ मालकांची युवा नेते प्रतिक पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू अभिषेक भुंगे याने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी केक कापून ना. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजवर्धन लाड, विजय लाड यांच्या वतीने ना. पाटील यांना युवा लिननचा आहेर करण्यात आला. किशोर गावडे (मुंबई) , प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शरद लाहिगडे हरिकन्स,विरुध्द कै. जगदीश आप्पा पाटील रायडर्स तसेच स्फूर्ती रॉयल्स विरुध्द राजेंद्रभाऊ पाटील फायटर्स यांच्यामध्ये सामने खेळविण्यात आले. यावेळी विनायक पाटील, पै. भगवान पाटील, शहाजीबापू पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, रणजित पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, लिंबाजी पाटील, ब्रह्मनंद पाटील, अतुल लाहिगडे, पृथ्वीराज पाटील, शिवाजी पवार यांच्यासह पदाधिकारी तसेच खेळाडू व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरुण कांबळे, आयुब हवलदार, सदानंद पाटील, सागर जाधव, उमेश रासनकर, विजय (सोन्या) देसाई यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू, सदस्य लीगचे नियोजन करत आहेत.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4419,नाशिक,802,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16302,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13521,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3663,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील
कबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील
https://1.bp.blogspot.com/-u5id_oKXvKE/YCvTtQ5LLqI/AAAAAAABoRQ/ivdEEgyiWhwVBZkhbm6OpPw84yAX3FOuwCLcBGAsYHQ/s320/16-8.jpg
https://1.bp.blogspot.com/-u5id_oKXvKE/YCvTtQ5LLqI/AAAAAAABoRQ/ivdEEgyiWhwVBZkhbm6OpPw84yAX3FOuwCLcBGAsYHQ/s72-c/16-8.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_760.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_760.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content