$type=ticker$snippet=hide$cate=0

लोकांचा बेफिकीरपणामुळे माण तालुक्यातील जनता कोरोनाच्या विळख्यात

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली असून दहिवडीतील कोरोना रुग्णांचा विस्फोट कारणीभूत आहे. दहिवडीक...


गोंदवले / वार्ताहर :
माण तालुक्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली असून दहिवडीतील कोरोना रुग्णांचा विस्फोट कारणीभूत आहे. दहिवडीकरांना दालचा महागात पडला असल्याची जोरदार चर्चा असून लग्न समारंभात होत असलेली गर्दी व लोकांचा बेफिकीरपणा यामुळे माण तालुक्यातील जनता कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बाजारपेठ ठप्प झाल्याने, उद्योग धंदे बंद पडल्याने दहिवडी च्या बाजारपेठेचे कोट्यवधी चे नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात माण तालुक्यात सर्वात कमी रुग्ण होते. मुंबईसह बाहेर गावाहून हजारो लोक आपापल्या गावी आले. परंतू गावागावात जागरूक नागरिक होते. प्रशासन सतर्क होते, सर्वजण काळजी घेत होते. माण तालुक्याच्या एकीमुळे रुग्ण संख्या जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी होती. परंतू नोव्हेंबरपासून कोरोनाचा वेग मंदावला नव्हे तर कोरोना नाहीसा झाल्याने चित्र राज्यभर झाले होते. इतर देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. परंतू महाराष्ट्रात त्याचे पडसाद दिसत नव्हते. अगदी जानेवारी अखेर अशीच परिस्थिती होती.

त्यातून सर्वांची बेफिकिरी वृत्ती वाढत गेली. राजकीय कार्यक्रम मोठे होऊ लागले, निवडणुका ही होऊ लागल्या, सर्वात मोठा कहर म्हणजे हजारोच्या उपस्थितीत लग्न समारंभ होऊ लागले. परंतू अचानक फेब्रुवारीच्या दुसर्‍या टप्प्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. तरीही ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यातून काही रुग्ण सापडू लागले. माणमध्ये पुन्हा रुग्ण वाढले. परंतू याचे गांभीर्य कोणीच लक्षात घेतले नाही. हजारों लोकांच्या साक्षीने लग्न समारंभ पार पडत आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दहिवडीमध्ये कोरोणाच्या वाढीला गती मिळाली. नगरपंचायतीची परवानगी लग्नासाठी कोणीही घेताना आढळले नाही.

मास्क वापरणे, एकमेकामध्ये संवाद करताना अंतर ठेवणे, हात धुणे हे जवळपास सर्वांनीच बंद केल्याचे दिसून येत होते. सर्वत्र गर्दी होत होती. कोणाला कसलीच पर्वा नव्हती. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशीच समजूत अजूनही सर्वांची असल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते.

दहिवडीकराना दालच्या नडला

दहिवडीमध्ये झालेली लग्ने व त्यातून वाढत गेलेली कोरोणाची साखळी त्यातच दहिवडी करांचा बेफिकीर पणा अंगाशी आला आहे. एका लग्नातील दालच्या दहिवडीकरांना नडला असल्याची चर्चा ही जोर धरू लागली आहे.

तरुणाई मध्येच रुग्ण संख्या जास्त

दहिवडीची कोरोनाची मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता 18 ते 45 वयोगटातील 61 रुग्ण आढळले आहेत. त्यात चोवीस महिलांचा समावेश आहे. 45 ते 60  वयोगटातील 28 रुग्ण आहेत, त्यात सात महिला आहेत. 60 च्या पुढच्या वयोगटातील 9 रुग्ण असून त्यात चार महिला आहेत. 18 वर्षाखालील 20 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. असे एकूण 117 रुग्ण आज अखेर सापडले आहेत. त्यातील 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तालुक्यात एकूण 153 रुग्ण उपचार घेत आहेत.

दहिवडी बंदमुळे बाजारपेठ कोलमडली; शेतकर्‍यांचे ही मोठे नुकसान

दहिवडी ही तालुक्याची बाजारपेठ आहे. येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे येथे वर्दळ जास्त असते. पाहिले तीन दिवस व आत्ताचे दहा दिवस असे तेरा दिवस पूर्ण लॉकडाऊन झाले आहे. रोज मिळेल ते काम करून हाता तोंडाची गाठ घालून जगणार्‍यांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक नाशवंत मालाची विक्री करणारे व्यापारी, दुकानदार, शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबर बंदमुळे संपूर्ण बाजारपेठेचे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. पहिल्या लॉकडाऊनमधील नुकसानीतून सावरत असताना या लॉकडाऊनमुळे दहिवडीकरांचे कंबरडेच मोडले आहे. पूर्वीची शिल्लक लोकांची संपत चालली आहे. मार्केटमधील मंदीने व्यावसायिक वैतागले होते. अनेक व्यावसायिक कर्ज काढून व्यवसाय करत असल्याने बँकेचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्‍न सर्वांसमोर उभा राहिला आहे. कोरोनाचे परिणामही रोगा पेक्षा भयंकर असल्याचे दिसून येत आहे.

काय काय घडले आज दहिवडीत

दहिवडी कोरोणाचे हॉट स्पॉट झाल्याने पूर्ण शहर सिल करण्यात आले आहे. सर्व प्रमुख रस्तेही बंद केले आहेत. फक्त फलटणकडून येणारा व सांगलीकडे जाणारा एकच हायवे सुरू ठेवण्यात आला आहे. साताराकडून येणार्‍या गाड्या खंडसरी चौकातून दहिवडीमध्ये येथील पिंगळीतून दहिवडीमध्ये येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. एसटीच्या स्थानिक फेर्‍या दहिवडी आगाराने रद्द केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांचा दहिवडीशी संपर्क तुटण्यास मदत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने दहिवडीसाठी 25 पथके तयार केली आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्व्हे केला जात आहे.  ताप, थंडीचे रुग्ण आहेत का? याची चाचपणी केली जात आहे. रुग्ण आढळल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी पाठवले जात आहे. आज जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन पाटील यांनी सर्व्हे करणार्‍या महिलांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी कोरोना बाधित झालेल्या रुग्णांच्या घरी जावून विचारपूस केली. नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांची भेट घेऊन सूचना केल्या. आरोग्य विभागाने दहिवडीमध्ये कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविले आहे. सध्या दहिवडीमध्ये 99 रुग्ण असून त्यातील 59 रुग्ण रुग्ण होम आईसोलेशनमध्ये आहेत. तर 40 रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर व डॉ हेमंत जगदाळे यांनी दिली. माहिती लपवणार्‍यांवर होणार कारवाई

जे रुग्ण अचूक माहिती देत नाहीत. काहीजण माहिती लपवत आहेत, अशा सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. नाहीतर त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी लागेल. संपर्क यादी लवकरात लवकर करावी. सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे. ग्राहकांसाठी बँका बंद ठेवाव्यात. फक्त कार्यालयीन कामकाज करावे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नवीन दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी टाळावी. शक्यतो लोक येतील अशी कामे बंद ठेवावीत म्हणजे दहिवडीत बाहेरून लोक येणार नाहीत. अशा सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज दिल्या.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: लोकांचा बेफिकीरपणामुळे माण तालुक्यातील जनता कोरोनाच्या विळख्यात
लोकांचा बेफिकीरपणामुळे माण तालुक्यातील जनता कोरोनाच्या विळख्यात
https://1.bp.blogspot.com/-9Sndu4kXDRU/YDe9m8QbJZI/AAAAAAABolI/HOD2xvo2unsBQoLCVnEeuw9-TI3gA7CJQCLcBGAsYHQ/s320/corona%2Bvirus.jpg
https://1.bp.blogspot.com/-9Sndu4kXDRU/YDe9m8QbJZI/AAAAAAABolI/HOD2xvo2unsBQoLCVnEeuw9-TI3gA7CJQCLcBGAsYHQ/s72-c/corona%2Bvirus.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_774.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_774.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content