अहमदनगर/प्रतिनिधी: ’आपल्या देशात पेट्रोल-डिझेलची 90 टक्के आयात करावी लागते. कोरोनामुळे आयात आणि वाहतूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे...
अहमदनगर/प्रतिनिधी: ’आपल्या देशात पेट्रोल-डिझेलची 90 टक्के आयात करावी लागते. कोरोनामुळे आयात आणि वाहतूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सध्या इंधनाची दरवाढ झाली असावी,’ असा अंदाज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
इंधनाच्या दरात हस्तक्षेप करण्याचा अधिका
र सरकारला नाही, तो परत मिळावा यासाठी येत्या अधिवेशनात आम्ही पंतप्रधानांकडे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. बहुतांश ठिकाणी शंभरी गाठत आहे. या विरोधात आंदोलने सुरू आहेत, तर केंद्र सरकार मात्र यामध्ये आपला नाइलाज असल्याचे सांगत आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की पूर्वी इंधनाच्या दरात हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार होता; मात्र काँग्रेस सरकारच्या काळात त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे दर ठरविणारी पेट्रोलियम कंपन्यांची स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आली. त्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नाही; मात्र यात जनतेच्या रोषाला सरकारलाच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता यात हस्तक्षेपाचा अधिकार केंद्र सरकारला पुन्हा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या अधिवेशनात हा मुद्दा घेऊन मोदी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय होऊ शकतो,’ असे त्यांनी सांगितले.