$type=ticker$snippet=hide$cate=0

औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू ; साई संस्थान; कारवाई टाळण्यासाठी संबंधितांची धडपड

  भागा वरखडे/अहमदनगर : साई संस्थानमध्ये आवश्यक तरतूद असतानाही गेल्या पाच वर्षांत रुग्णालयांसाठी औषध खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात आली. रुग्ण...

 

भागा वरखडे/अहमदनगर : साई संस्थानमध्ये आवश्यक तरतूद असतानाही गेल्या पाच वर्षांत रुग्णालयांसाठी औषध खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात आली. रुग्णालयातील औषध खरेदी विभागाचे त्यात काही आर्थिक हितसंबंध आहेत का, याची चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सुरू केली असून त्यातून अन्य मोठी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चौकशी दडपण्यासाठी दबाव वाढला आहे.


साई संस्थानची दोन रुग्णालये आहेत. या रुग्णालयात राज्याच्या बर्‍याच भागातून लोक उपचारासाठी येत असतात. रुग्णालयातील औषध खरेदीसाठी दरवर्षी मोठी तरतूद केली जात असते. रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असताना औषध खरेदी मात्र कमी होत आहे. अ‍ॅड. संदीप कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली. सहा वर्षांपूर्वी 42 कोटी रुपयांची औषध खरेदी होत होती, तर त्यानंतर ती वाढायला हवी होती; परंतु औषध खरेदी विभागातील काहींचे बाहेरच्या औषध विक्रेत्यांशी संधान असल्याचा संशय आहे. त्यातून संस्थानच्या रुग्णालयात औषध उपलब्ध करण्याऐवजी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणायला भाग पाडले जात होते. त्यात काही आर्थिक हितसंबंध असावेत, अशी शंका आहे. साई संस्थानचे औषधालय आहे. तिथे मोठ्या प्रमाणात औषधे लागत असल्याने थेट कंपन्यांकडून मोठया प्रमाणात औषध खरेदी केली, तर सुमारे तीस टक्के सूट मिळते. त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना करून देणे आवश्यक असताना औषधांची मागणीच केली जात नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. अधिक माहिती घेतली असता रुग्णालयातील औषध विभागातील एकाचे बाहेरच्या औषध विक्रेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत, असे समजते. त्याच व्यक्तीचा एक मित्र कथित सामाजिक कार्यकर्ता आहे. औषध विक्री प्रतिनिधी म्हणून तो या दुकानांना औषधे पुरवितो. या दोघांच्या कथित मैत्रीचा फटका मात्र सामान्य रुग्णांना बसतो. बाहेरून औषध आणायला सांगितले जात असल्याने संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांच्या परिसरात औषधांची दहांहून अधिक दुकाने आहेत. त्यातील तीन दुकाने तर एकाचीच आहेत. साधे मागच्या वर्षाचे उदाहरण घेतले, तरी औषध खरेदीसाठी साठ कोटी रुपयांची तरतूद असताना फक्त पाच कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. आणखी दोन कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी होण्याची शक्यता गृहीत धरली, तरी औषध खरेदी करण्यासाठी निधी देऊनही कशी टाळाटाळ केली जाते, हे स्पष्ट व्हायला हरकत नाही. अ‍ॅड. कुलकर्णी यांच्या तक्रारीनंतर बगाटे यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली. त्यासाठी नेमलेल्या पहिल्या समितीला ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनीच आक्षेप घेतला. औषधांची गरज आणि प्रत्यक्षात मागणी याचा विचार केला, तर किमान पाचशे प्रकरणात औषधे फारच कमी मागविण्यात आल्याचे दिसते. या चौकशीला विरोध झाल्यानंतर आता दुसर्‍या समितीकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील काहींनी थेट राजकीय नेत्यांशी संपर्क साधून चौकशी थांबविण्याचे साकडे घातले आहे. बगाटे यांच्यावरही दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर चौकशी किती निरपेक्षपणे होते आणि त्यावर कुणाचा दबाव तर येणार नाही ना, हे पाहायचे, की रुग्णहित यातून बगाटे यांना एकाची निवड करावी लागेल.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू ; साई संस्थान; कारवाई टाळण्यासाठी संबंधितांची धडपड
औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू ; साई संस्थान; कारवाई टाळण्यासाठी संबंधितांची धडपड
https://images.jdmagicbox.com/comp/shirdi/i8/9999p2423.2423.180207113432.z7i8/catalogue/sai-baba-hospital-nashua-paket-shirdi-hospitals-0otu3wqiw7.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_788.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_788.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content