पुणे/प्रतिनिधी: राज्य सरकारने आणि पुणे महापालिका आयुक्तांनी शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहे; मात्र पुण्यात भाजप नेत्यांच्या उ...
पुणे/प्रतिनिधी: राज्य सरकारने आणि पुणे महापालिका आयुक्तांनी शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहे; मात्र पुण्यात भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात एका दुकानाचे उद्घाटन कसे होते, आहे असा सवाल करत मनसेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
पुण्यातील कर्वे पुतळा चौक येथे महापौर, भाजपच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार यांच्या उपस्थितीत एका दागिन्यांच्या दुकानाचे आज उद्घाटन झाले. शिवजयंतीला बंदी असताना हा ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम होतो कसा असा सवाल विचारत मनसे नेत्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. नेत्यांनी पोलिस तक्रार केली आहे. तक्रारीनंतर पोलिस आल्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. शिवजयंतीवर बंधने घालत महापौरांनी पुणेकरांना धमकी दिली आणि आज शेकडोंच्या उपस्थितीत दोलताशांचे पथक लावत उद्घाटन कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात येतो, असा सवाल असे मनसेचे कोथरुड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी केला. कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षिततेचे कुठल्याही नियमांचे पालन होताना इथे दिसले नाही, असे निदर्शनास आणून अलंकार पोलिस ठाण्याला त्यांनी फोन करून गुन्हा दाखल करण्याची विंनती केली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर कार्यक्रम बंद करायला सांगितले.