सातारा / प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच-उपसरपंच निवडीसाठी 8 त...
सातारा / प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच-उपसरपंच निवडीसाठी 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत विशेष सभा आयोजित करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार कार्यालयांना दिल्या आहेत.
डिसेंबर महिन्यात सातारा जिल्ह्यातील 1 हजार 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित 875 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. मतमोजणीनंतर सर्वांना सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले होते. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच झाली. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आता गावोगावी पुन्हा एकदा सरपंचपदाच्या गुलालाची उधळण होणार आहे. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असलेल्या गावांमध्ये यानिमित्ताने गटबाजीला उधाण येणार आहे.
एकूण ग्रामपंचायतींपैकी 756 गावांच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहे. उर्वरित 659 गावांचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले झाले आहे. डिसेंबर महिन्यात 1 हजार 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. स्थानिक गटांत समझोता झाल्याने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविरोध ग्रामपंचायती वगळून अन्य ठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया झाली. निकालानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले होते. त्यानुसार आरक्षणाची सोडत नुकतीच तालुक्यांच्या ठिकाणी झाली. एकूण ग्रामपंचायतींपैकी 756 गावांच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहेत. उर्वरित 659 गावांचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले झाले आहे.
सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच निवडीसाठीची विशेष सभा सोमवार, दि. 8 ते बुधवार, दि. 10 या कालावधीत गावपातळीवर घेण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीत अनेक ठिकाणी बहुमत असले, तरी सरपंचपदाचे आरक्षण विरोधी गटाला अनुकूल पडले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता दिसली. सत्ता असूनही महत्त्वाचे पद मिळत नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. अनेक गावांमध्ये आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील एकच उमेदवार असल्याने गुलालाची उधळण करत सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मिरवणुका काढण्यात आल्या.