$type=ticker$snippet=hide$cate=0

स्वतः प्रतिष्ठा घालवल्यानंतर सन्मान कसा मिळेल?

इतरांकडून सन्मान मिळण्याची अपेक्षा केली जात असेल, तर त्या पदाचा सन्मान स्वतःही राखावा लागत असतो. घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पदावर असलेल्य...



इतरांकडून सन्मान मिळण्याची अपेक्षा केली जात असेल, तर त्या पदाचा सन्मान स्वतःही राखावा लागत असतो. घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी या पदाचं महत्त्व अबाधित ठेवायचं असतं; परंतु जी व्यक्ती स्वतः च या पदाचं महत्व घालवून बसते आणि राजकीय नेत्यांसारखं वागतं, त्या व्यक्तीनं इतरांकडून जशास तसं उत्तर मिळालं, तर त्यात त्या पदाचा नव्हे, तर आपला अवमान आहे, असं समजायचं असतं. विरोधकांनीही या विषयावर राजकीय कलगीतुरा सुरू केला, की मग त्यांच्यावरही बाजू उलटू शकते, याचं भान ठेवायचं असतं.

राज्यपाल हे घटनात्मक महत्त्वाचं पद आहे. या पदावर कोण व्यक्ती आहे, यापेक्षा पदाचा सन्मान राखायला हवा. राज्यपालांचा सन्मान राखण्याचं काम जसं राज्य सरकारचं आहे, तसंच राज्यपालपदावरील व्यक्तीनं स्वतः ही त्या पदाचा सन्मान राखायला हवा. राज्यपालपदावरील व्यक्तीचं वागणंही या पदाचा सन्मान राखते, की नाही, हे ठरवित असतं. राज्य घटनेनं धर्मनिरपेक्ष सरकार असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सरकार धर्मनिरपेक्ष वागतं, की नाही, ह8े पाहण्याची जबाबदारी राज्यपालांची असते; परंतु ज्या घटनेनं पदावर बसविलं, त्या घटनेचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच अवमान केला. शिवसेनेला धर्मनिरपेक्ष कशी झाली, असं कुत्सितपणे विचारलं. या पदाचा घटनात्मक मान राज्य सरकारनं राखायलाच हवा; परंतु राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीनं तो अगोदर राखायला हवा. राज्यपाल राजकीय नेत्यांसारखं वागायला लागले, लोकनियुक्त सरकारची वारंवार अकारण कोंडी करायला लागले, की सरकारनं त्यांच्यांशी चांगलं वागायला हवं, त्यांचा सन्मान राखायला हवा, अशी अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी हे राज्यपाल कमी आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच जास्त वागतात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला वेळ, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी दिलेला कालावधी हे पाहिलं, तरी त्यांचा पक्षपातीपणा दिसतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारसाठी मध्यरात्रीच राष्ट्रपती राजवट मागं घेऊन पहाटेच शपथविधी करण्याइतकं कार्यक्षम झालेलं राजभवन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर तीन महिने शिक्कामोर्तब करीत नाही. ते इतकंअकार्यक्षम कसं झालं, या प्रश्‍नांतच राजकारण आलं. विद्यापीठांच्या परीक्षांवरून त्यांनी राज्य सरकारची कोंडी केली. राज्यपाल घटनात्मक प्रमुख जरूर आहेत; परंतु त्यांना राज्यघटनेनंच मर्यादा घालून दिलेल्या आहेत. कोश्यारी यांना मात्र या मर्यादांची जाणीव नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वारंवार भेटण्यासाठी, कंगणासारख्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो; परंतु शेतकर्‍यांचं आंदोलन अगोदर ठरलं असताना आंदोलनाच्या दिवशी राज्यपाल गोव्यात निघून जातात. त्यांना भेटत नाहीत, यावरून राज्यपालांचं वागणं आणि त्यांचा प्राधान्यक्रम कसा वाद निर्माण करणारा आहे, हे दिसतं. राज्यपालांना सरकारी विमान उपलब्ध करून देण्यावरून आता झालेला वाद हा त्याचाच पुढचा भाग आहे.

कोश्यारी यांना मसुरीला जाण्यासाठी राज्य सरकारनं विमान उपलब्ध करून न दिल्याचा दावा राजभवनाकडून करण्यात आला आहे. विमान उपलब्ध करून दिलं नाही, हे राजभवनाचं म्हणणं खरं आहे; परंतु मुख्यमंत्री कार्यालयानं एक दिवस अगोदरच विमान उपलब्ध करून देता येणार नाही, असं सांगितलं असताना राजभवनाच्या अधिकार्‍यांनी ही बाब राज्यपालांच्या कानावर घातली नाही. त्यामुळं राज्यपालांना विमानातून उतरून राजभवनावर येण्याची नामुष्की ओढवली. राज्यपाल आणि मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत स्पष्टीकरण दिलं असलं, तरी राजकीय नेत्यांनी त्यावरून कलगीतुरा सुरू केला आहे. राज्य सरकारचं विमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना प्राधान्यानं उपलब्ध करून द्यावं लागतं. अन्य कुणालाही विमान द्यायचं असेल, तर त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. विमानात काही तांत्रिक बिघाड असेल किंवा अन्य कुणासाठी ते अगोदरच आरक्षित झालं असेल, तर ते उपलब्ध नाही, असं सांगितलं जातं. राज्यपालांना विमान उपलब्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे; परंतु विमान दिलंच पाहिजे, हा नियम नाही. सध्याच्या विरोधी पक्षानं आता त्यावर काहूर माजविला असला, तरी कधी काळी हा पक्ष सत्तेत होता आणि त्यांना राज्यपाल, सरकारच्या अधिकारांची आणि त्यांच्या मर्यादांची माहिती असताना त्याकडं कानाडोळा करून सत्ताधारी पक्षाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेच्या तोफा डागल्या. अहंगंड असलेलं हे सरकार असल्याची टीका केली. राज्य शासनानं चार्टर फ्लाईट उपलब्ध करून द्यावं, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं होतं. ते उपलब्ध का करून दिलं गेलं नाही, याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. या घटनेचा फडणवीस यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका अहंकार असलेले सरकार पाहिलेलं नाही. कालच राज्यपालांच्या कार्यालयानं संबंधित अधिकार्‍यांकडं परवानगी मागितली होती. जेव्हा राज्यपाल विमानात बसले, तेव्हा असं कळलं, की त्यांच्या विमानाला उड्डाणाची परवानगी नाही. राज्यपाल ही व्यक्ती नाही, तर ते एक संवैधानिक पद आहे. त्याचा योग्य आदर केला पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटले. त्यावर खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांचा सन्मान राखला आहे. विमान उपलब्ध नसल्याचं अगोदरच कळविण्यात आलं होतं. विमान ऐनवेळी रोखण्यात आलेलं नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं रोखून धरली आहेत. हे बेकायदेशीर आहे. हे दहा मिनिटांचं काम आहे. फाईल उघडून फक्त सही करायची आहे. हे तर कायद्याच्या विरोधात तर आहेच; पण घटनेच्या विरोधातही आहे. 15 मिनिटं विमानात बसावं लागलं, तर त्यांना हे अयोग्य वाटतं. अपमानास्पद वाटतं; पण मंत्रिमंडळानं एखादा सहमतीनं पाठवलेला प्रस्ताव तुम्ही रोखून धरत असाल, तर तो ही मंत्रिमंडळाचा अपमान आहे; पण ही गोष्ट सोडून द्यायला हवी. राज्यपालांचा सन्मान राखला जायला हवा, असं आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या चार्टर विमानाच्या वापरासाठीची परवानगी वेळेत न आल्यानं राज्यपालांनी डेहराडूनला जाण्यासाठी प्रवासी विमानानं प्रवास केल्याचं स्पष्टीकरण राज्यपालांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं. राज्यपालांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोश्यारी हे मसुरीमधल्या आयएएस अधिकार्‍यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यासाठी डेहराडूनला सरकारी विमानानं जाण्यासाठीची परवानगी दोन फेब्रुवारी रोजी मागण्यात आली होती आणि हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळवण्यात आल्याचं राज्यपालांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. या प्रवासासाठी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता विमानतळावर पोहोचून राज्यपाल सरकारी चार्टर विमानात बसले; पण या विमानाच्या वापरासाठीची परवानगी अद्याप आली नसल्याचं त्यांना सांगण्यात आल्यानंतर, त्यांच्या सूचनांनुसार प्रवासी विमानाची तिकीटं काढण्यात आली आणि ते डेहराडूनला रवाना झाल्याचं राज्यपालांच्या कार्यालयानं पाठवलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबतचा ठपका राजभवनावर ठेवला आहे. विमान उपलब्ध नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं एक दिवस अगोदर राजभवनाला कळविलं होतं. राजभवन सचिवालयानं राज्यपालांच्या दौर्‍याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्यानं राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला, असं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. दहा फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयानं राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणं अपेक्षित होतं; मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकार्‍यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्यानं राज्यपालांना शासकीय विमानानं इच्छित स्थळी जाता आलं नाही. असं स्पष्ट करत राज्यपालांच्या कार्यालयाची ही चूक असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. तसंच घटनेची गंभीर दखल घेत राजभवनातील संबंधित अधिकार्‍यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, सरकारनं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री कार्यालयानं राजभवनावर ठपका ठेवला असून कारवाईचा चेंडू ही त्यांच्याकडंच भिरकावला आहे. तुम्ही राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला खुर्चीवरून उतरवेल, अशी घणाघाती टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांना विमानातून न उतरविताही भाजपला सत्तेबाहेर का जावं लागलं, हे भाजपच्या नेत्यांना अजून कळालेलं दिसत नाही. अनलॉकच्या काळात मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं पत्र बरंच गाजलं. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही,’ हिंदुत्त्वाचे धडे कुणाकडूनही घ्यायची गरज नाही,’ असं म्हटलं होतं.


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: स्वतः प्रतिष्ठा घालवल्यानंतर सन्मान कसा मिळेल?
स्वतः प्रतिष्ठा घालवल्यानंतर सन्मान कसा मिळेल?
https://1.bp.blogspot.com/-LshzCd7-X_M/YCaMjeKhr5I/AAAAAAABoLs/lKzUDMI0BP0BD37cSWlHGHdkU2-5b9FIQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-LshzCd7-X_M/YCaMjeKhr5I/AAAAAAABoLs/lKzUDMI0BP0BD37cSWlHGHdkU2-5b9FIQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_823.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_823.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content