नवी मुंबईः बाजार समितीतील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पवार हे गेल्या दोन महिन...
नवी मुंबईः बाजार समितीतील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पवार हे गेल्या दोन महिन्यांपासून रजेवर होते. आज ते हजर होण्यासाठी आले होते; मात्र प्रत्यक्षात पदभार घेण्याआधीच त्यांनी पोलिस ठाण्यातील एका रूममध्ये स्वतःवर गोळी झाडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी घरगुती वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.