परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थाचा साठा जप्त वाई / प्रतिनिधी : यशवंतनगर, ता. वाई येथील नंदनवन सोसायटीतील एका ’रो-हाऊस’वर सोमवार, दि. 15 रो...
परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थाचा साठा जप्त
वाई / प्रतिनिधी : यशवंतनगर, ता. वाई येथील नंदनवन सोसायटीतील एका ’रो-हाऊस’वर सोमवार, दि. 15 रोजी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकून दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन बंगल्यात लागवड केलेला अंमली पदाथ व त्याचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नंदनवन सोसायटीतील ’विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आपल्या सहकार्यांनी अचानक घराची तपासणी केली. तपासणीदरम्यान घरामध्ये व घराच्या गच्चीवर अंमली पदार्थांची लागवड केल्याचे आढळून आले. तसेच घरातील बाटल्यांमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा केल्याचेही निदर्शनास आले. (पान 1 वरुन) याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व उपअधीक्षक धीरज पाटील यांना देण्यात आली. या घरात वास्तव्यास असलेल्या दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. घराचा पंचनामा करून घर सील करण्यात आले आहे. पुण्याहून फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना वाई येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा करून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी घरमालकाच्या चौकशी बरोबरच परदेशी नागरिकांच्या सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व उपअधीक्षक धीरज पाटील सध्या वाई येथे थांबून बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.