अजमेर : पंतप्रधान म्हणत आहेत, की मी कृषी कायद्यांना तीन पर्याय दिले. हो, त्यांनी पर्याय दिले आहेत, ते म्हणजे भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या....
अजमेर : पंतप्रधान म्हणत आहेत, की मी कृषी कायद्यांना तीन पर्याय दिले. हो, त्यांनी पर्याय दिले आहेत, ते म्हणजे भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकर्यांची चर्चा करू इच्छितात; मात्र शेतकरी तोपर्यंत बोलू शकणार नाहीत, जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे, उद्योजकांची नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
राजस्थानमधील रुपनगढ येथे आज(शनिवार) राहुल यांनी किसान महापंचायतीला संबोधित केले. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकर्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. राहुल यांनी ट्रॅक्टरवर बसून या रॅलीची सुरुवात केली.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून राहुल यांनी सरकारवर हल्ला चढविला होता. या कायद्यांमुळे बडया उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल, असे ते म्हणाले होते. कुटुंब नियोजनासंदर्भातील हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ दिला आणि केवळ चार-पाच जण देशाचा कारभार करीत असल्याची टीका राहुल यांनी केली होती.