या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभजप्रया निवडणुका आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या...
या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभजप्रया निवडणुका आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या चारही राज्यांना संबोधण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगाल आणि आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणार्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळ आणि तमिळनाडूत महामार्गांसह मेट्रो उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांतील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणार्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपयांचे महामार्ग तयार होणार आहेत. कोलकाता-सिलीगुडी रस्त्याचे अपग्रेड होईल. आसाममध्ये राष्ट्रीय महामार्गावर 34 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. केरळ-तमिळनाडू मध्ये मेट्रो आणि महामार्ग होतील. कोची (केरळ) मेट्रोसाठी 1900 कोटी रुपये खर्चून 11 किलोमीटरचा भाग तयार केला जाईल. चेन्नई (तमिळनाडू) मध्ये 63 हजार कोटींच्या खर्चाने 180 किलोमीटर लांब मेट्रो मार्ग उभारला जाईल. तमिळनाडूत 3500 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत एक लाख तीन हजार कोटी रुपये खर्च केले जातील. त्याचे बांधकाम पुढील वर्षापासून सुरू होईल. केरळमध्ये 1100 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे बांधले जातील. याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरदेखील उभारले जाईल. केरळमध्ये त्यावर 65 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.