नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीचा मोठा फटका आरोग्य क्षेत्राला बसला आह...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीचा मोठा फटका आरोग्य क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून नागरिकांचे आरोग्य कसे सुरक्षित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटी. आरोग्य खात्यासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींची २०१२-२२ आर्थिक वर्षात तरतूद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मिशन पोषण २.० सुरु करणार. जल जीवन मिशन शहरी भागांसाठीही सुरू. शहरी भागासाठी स्वच्छ भारत मिशनसाठी १ लाख ४१ हजार कोटींची तरतूद. पुढील सहा वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रावर ६४ हजार १८० कोटी रुपये खर्च करणार. नव्या आरोग्य योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद. प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्याची घोषणा. स्वच्छ पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट. शहरी क्लिन इंडिया मिशनसाठी १ लाख ४१ हजार कोटींची तरतूद.