$type=ticker$snippet=hide$cate=0

लेखनातून स्वतः व्यक्त होता तेच साहित्य खरे अजरामर : जगन्नाथ शिंदे

संजय कांबळे (पाटण / प्रतिनिधी) : पाटणची माती आणि कोयना तीर हा अतिशय दैदिप्यमान आहे. या मातीत होत असलेल्या साहित्य संमेलनातून एखादा साहित्यिक...


संजय कांबळे (पाटण / प्रतिनिधी)
: पाटणची माती आणि कोयना तीर हा अतिशय दैदिप्यमान आहे. या मातीत होत असलेल्या साहित्य संमेलनातून एखादा साहित्यिक, कवी घडू शकतो. पाटणच्या भूमीला साहित्याची परंपरा लाभलेली आले. या भूमीने अनेक कथा मला दिल्या आहेत. शेतकरी, सर्वसामान्यांनी आपल्या व्यथा लेखणीतून मांडल्या तर ते साहित्य होते. ज्यावेळी तुम्ही लेखनातून स्वतः व्यक्त होता तेच साहित्य खरे अजरामर होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कथा, कादंबरी व नाट्य लेखक जगन्नाथ शिंदे यांनी केले.

कोरोना पार्श्‍वभूमीवर यावर्षी शासनाचे नियम पाळून टेकावरचा वाडा येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात स्वा. सै. कै. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथ आणि सरस्वती पूजनाने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील पर्यावरण व शेती शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पाटणकर, रयत शिक्षण संस्था सातारचे जनरल सदस्य जयवंतराव पाटील, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा, गजलकार इलाही जमादार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

जगन्नाथ शिंदे पुढे म्हणाले, गुलाल आणि अभिरापेक्षा मोठी इथली माती आहे. पाटणच्या मातीत कितीतरी आदर्श आहेत. दोन हजारहून जास्त वय असणारी आपली मराठी भाषा आहे. लेखण कौशल्य येण्यापूर्वीपासून बोलीभाषेत मराठी रुजली होती. लोकांनी आपल्या वेदना लिहायला सुरवात केली तेंव्हा साहित्य जन्माला आले. कथा कादंबर्‍यांमध्ये लोकांच्या भावना एकटवलेल्या असतात. तुम्ही लिहायला शिका. जेव्हा लिहायला लागाल तेंव्हा व्यक्त व्हाल. डोंगरासारखी माणसं तुम्ही आहात आणि आभाळाएवढं प्रेम ही तुमच्याकडे आहे. या साहित्य संमेलनातुन एखादा साहित्यिक घडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सोमनाथ पाटणकर म्हणाले, आज शेतीमध्ये नवनविन प्रयोग झाले पाहिजेत. संशोधनात तळागळामध्ये पोहचणारे संशोधक नाहीत. हरित क्रांतीचा सर्वांनी फायदा घेतला. मात्र, त्याचा तोटा आपण लक्षात घेतला नाही. आमच्या मातीमध्ये निरनिराळे गुणधर्म आहेत. आपल्या ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्ती एकत्रित करुन त्याची विक्री मोठ्या प्रमाणात पुण्या-मुंबईत होत आहे. नवीन महाबळेश्‍वर प्रकल्पाने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पाटण तालुका हा संपन्न व समृध्द आहे. पाटण तालुक्याचा वारसा टिकवून पाटण तालुक्यात हरित क्रांती करायची आहे. आम्ही संशोधन करु नवनवीन प्रयोग करु शकतो. परंतू साहित्य रुपात ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम एक साहित्यिकचं करु शकतो.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी जयवंतराव पाटील म्हणाले, भडकबाबांनी आपले विचार कठोरपणे मांडले. त्यांचे विचार आत्मसात करावेत. आपला तालुका मागासलेला आहे. तीन चार खोर्‍यात तालुका विखुरला आहे. येथे जास्त शेती उत्पादन निघत नाही. येथील लोकांना डोंगरातील विपुल निसर्गसंपदेची माहिती नाही. मार्केटिंग करता येत नाही, हे मागासलेपण दूर करण्याचे काम साहित्य करते आणि ते काम बाबांनी केले आहे. कवी यशवंत, कवी विहंग या मातीने दिले त्यांचे स्मरण होणे गरजेचे आहे. साहित्य समेलनामुळे ग्रामीण जनतेला व्यसपीठ मिळाले आहे. साहित्य आणि पुस्तक मिळाले. साहित्यातून संशोधन करता आले पाहिजे. साहित्याची जोड देऊन शेती सुधारणा करता आली पाहिजे. साहित्यातून नवसमाज निर्मिती होऊ शकते. शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना साहित्य मिळाले पाहिजे. पुस्तकाचे वाचन झाले पाहिजे. शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळावे. वाचन चळवळ वाढीस लागावी हा संमेलनाचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक शोधण्याचे काम समेलनातून होत आहे. आपली संस्कृती साहित्यिकांमुळे टिकली आहे. यातून समाज निर्मितीचे काम होत आहे.

सुत्रसंचलन व मान्यवरांचे परिचय ग्रंथप्रेमी संजय इंगवले यांनी केले. विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले. करणसिंह पाटणकर यांनी आभार मानले. संमेलनास दिलीपराव मोटे, ए. व्ही. देशपांडे, संजय पाटील, अरुण खांडके, गोरख नारकर, फत्तेसिंह पाटणकर, शंकरराव कुंभार, सौरभ देशपांडे, डॉ. विद्या पाटील, डॉ. वीणा नांगरे, प्रा. विजया म्हासुर्णेकर, अनिल बोधे, खाशाबा चव्हाण, नाना पवार, सोमनाथ आग्रे, क्रांतिसिंह पाटणकर यांच्यासह ग्रंथप्रेमी, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,5,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11161,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,772,देश,4646,नाशिक,836,पुणे,920,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17915,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15295,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4309,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1691,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: लेखनातून स्वतः व्यक्त होता तेच साहित्य खरे अजरामर : जगन्नाथ शिंदे
लेखनातून स्वतः व्यक्त होता तेच साहित्य खरे अजरामर : जगन्नाथ शिंदे
https://1.bp.blogspot.com/-hAPt37jBGWo/YBvoTAIWncI/AAAAAAABn58/Z4edjhMUyUIk_05uBmjSajmrB0YXGEmGwCLcBGAsYHQ/s320/3-4.jpg
https://1.bp.blogspot.com/-hAPt37jBGWo/YBvoTAIWncI/AAAAAAABn58/Z4edjhMUyUIk_05uBmjSajmrB0YXGEmGwCLcBGAsYHQ/s72-c/3-4.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_874.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_874.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content