$type=ticker$snippet=hide$cate=0

तिच्या जगण्याचा उंबरठा का कुणी काढला?

या वर्षाची सुरुवात प्रचंड आशावादी करणारी आणि जीवनात मोठं होण्याची स्वप्न पाहणारी पूजा चव्हाण इतक्या नैराश्यात कशी गेली आणि अवघ्या दीड महिन्य...


या वर्षाची सुरुवात प्रचंड आशावादी करणारी आणि जीवनात मोठं होण्याची स्वप्न पाहणारी पूजा चव्हाण इतक्या नैराश्यात कशी गेली आणि अवघ्या दीड महिन्यांत तिच्यावर उपचार कोणते आणि का करावे लागले, हा अभ्यासाचा विषय आहे. अतिशय सुंदर असलेल्या पूजाला जीवनाचा इतका का कंटाळा आला, तिनं जीवन का संपविलं आणि तिच्या जीवन संपविण्याच्या घटनेशी मंत्र्यांचा काय संबंध आहे, हे मात्र तपासाअंती सिद्ध होणार असलं, तरी त्यात एका स्वप्नाळू, कवीमनाच्या युवतीचा गेलेला जीव परत येणार नाही.

जी मुलगी आयुष्याबद्दल इतकी आशादायी होती, जिला आयुष्य भरभरुन जगायचं होतं, जिला तिचं बँक खातं कायम भरलेलं हवं होतं, नाती समृद्ध हवी होती आणि सुखी आयुष्य हवं होतं, तिनं आपला अंत भयाण शांततेत केला. पूजाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं आणि शेवटच्या तीन पोस्ट सोडल्या, तर एकही पोस्ट अशी दिसत नाही, जिथं ती निराश दिसते. त्यामुळं असं काय घडलं, की तिला हा निर्णय घ्यावा लागला? यामागे कोण दोषी आहे? हे समोर येणं गरजेचं आहे. गेल्या आठवड्यापासून पूजाच्या सगळ्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्येही ती निराश असल्याचं दिसतं. आधी तिनं निराश असलेल्या फोटोवर कशी मी राहू, बोल कुठं जाऊ, मला काही समजेना. हे गाणं स्टेट्सला ठेवलं आहे. त्यानंतर तिनं देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही हे गाणं ठेवलं तर शेवटच्या स्टेटसमध्ये तिनं दृश्यम सिनेमातील घुटता हे दम हे गाणं ठेवलं आहे. त्यावरुन ती निराशेच्या काळोखात पूर्णपणे बुडाल्याचं कळतं आहे. त्यातून तिनं आत्महत्या केली. त्यावर तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या आत्महत्येला एका मंत्र्याला जबाबदार धरलं. एखाद्यावर आरोप झाले, म्हणजे तो गुन्हेगार होतो, असं नाही. गुन्हा दाखल झाला, की त्याचा तपास होतो. तपासानंतर गुन्हा सिद्ध झाला, तर त्याला आरोपी म्हणता येतं. सर्वोच्च न्यायालयानंही तसेच निर्देश दिले आहेत. अलिकडच्या काळात ’मीडिया ट्रायल’ करून एखाद्याला दोषी धरण्याची घाई होते. त्यातही राजकारणी लोकांना तर लगेच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं जातं. राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराच्या तक्रारीनंतर लगेच त्यांना दोषी ठरवून सर्वंच जण मोकळे झाले. संबंधित महिलेचे कारनामे उघड झाल्यानंतर संबंधित महिला बॅकफूटवर गेली. तिनं बलात्काराची तक्रार मागं घेतली. नंतर तिची बहीण तक्रार करायला पुढं आली. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, ही बाब न्यायप्रविष्ठ आहे, याचा विचार करावा, असं कुणालाच वाटलं नाही. भारतीय जनता पक्षानं मुंडे प्रकरणाचं भांडवल केलं. त्यातून काहीच साध्य झालं नाही. त्याचं कारण भाजपचे कृष्णा हेगडे हेच मुंडे यांच्या मदतीला आले आणि आता तर त्यांनी पक्षच सोडला. मुंडे यांच्यांशी ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या महिलेनं बलात्काराचे आरोप केले. मुलं डांबून ठेवल्याचं सांगितलं. उपोषणाचा इशारा दिला; परंतु नंतर ती महिला कुठं गेली, तिचा इशारा कुठं गेला, याचा पाठपुरावा कुणीही केला नाही.

मुंडे यांच्याविरोधातील आरोपावरची राळ अजून खाली बसत नाहीत, तोच शिवसेनेचे विदर्भातील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आरोपांचं काहूर माजलं आहे. राठोड व पूजा चव्हाण यांच्यातील 11 ऑडिओ क्लिप संशय निर्माण करणार्‍या आहेत. राठोड आपल्या कार्यकर्त्याला पूजानं आत्महत्या करू नये, यासाठी प्रयत्न करण्यास सांगत आहेत. त्यात कुणालाच काही वाटणार नाही; परंतु काहीही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगत आहेत, त्यावरून मात्र वाद होऊ शकतो. तसंच या संवादावरून पूजाच्या आत्महत्येमुळं आपल्यालाही आत्महत्या करावी लागेल, असं मंत्री सांगतात. या ऑडिओची विश्‍वासार्हता अजून सिद्ध व्हायची असली, तरी इतक्या ऑडिओ तेही बंजारा भाषेत असून त्याचा स्वैर अनुवाद पाहिला, तर पूजाच्या आत्महत्येला मंत्रीच जबाबदार आहेत, असा निष्कर्ष निघू शकतो. राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील एकमेव मंत्री असून ते वजनदार नेते आहेत. मुंडे यांच्या प्रकरणानंतर पंकजा मुंडे यांनी फक्त आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात, असं म्हटलं होतं. आता मात्र त्यांनी आपल्या मतदारसंघातील मुलीच्या आत्महत्येची चौकशी झालीच पाहिजे, असं म्हटलं आहे. पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूसंबधीच्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर भाजपचे नेते मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करून राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे; मात्र इतक्या सगळ्या गदारोळानंतरही राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता तर ते नॉट रिचेबल आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून राठोड यांच्याशी सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र राठोड यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळं आता राठोड आपलं मौन नक्की कधी सोडणार, याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पूजा आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री राठोड हेच पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात राठोड यांचं घेतलं जाणारं नाव आता उघडपणे घेतलं जात आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट राठोड यांच्या मुसक्या आवळा, असं त्या म्हणाल्या आहेत. भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं सोपं असतं. आता ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली असली आणि त्याचं भांडवल भाजप करीत असला, तरी शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना चौकशी तर करू द्या, त्यांच्या तपासातून जे बाहेर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे; परंतु भाजपचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला कडवा विरोध आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड; पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलिस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. पोलिसांकडे पुरावे आले, तर ते कारवाई करतील. आत्महत्या असेल, तर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करायला हवा; परंतु ज्यांनी विधिमंडळात काम केलं, महिलांच्या अधिकारावर ज्या काम करतात, त्या महिलांनी भावनांच्या आधारावर जाऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उलट, संबंध नसलेली कलमं लावली, तर आरोपीला संशयाचा फायदा मिळण्याची शक्यता असते. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील शिक्षेत फारसा फरक नसतो. दबावासाठी गुन्ह्याचं गांभीर्य वाढविणं म्हणजे संशयाचा फायदा करून देण्यासारखं असतं. पूजाची बहिण दिया चव्हाण ही आता पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढं सरसावली आहे. ’सोशल मीडिया’वर पूजा चव्हाणबद्दल तर्कवितर्क लढवणार्‍यांचा तिनं चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून तिनं माझी बहिण वाघीण होती. ती असं करू शकत नाही. जर तिनं आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. काहीही विचारपूस न करता, माहिती न घेता टाकल्या जात असलेल्या पोस्टवर ती नाराज आहे, असं दिसतं. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती, की असं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलं माहिती आहे. मला आजसुद्धा विश्‍वास होत नाही, तिनं सुसाईड केलं. दीदीनं नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिनं फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसं स्वत:ला सांभाळत आहोत. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. त्यामुळं तिला न्याय मिळू शकत नाही. अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीनं राहू द्या, ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल, याचा विचार करा, असं तिनं म्हटलं आहे.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11194,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,774,देश,4657,नाशिक,836,पुणे,934,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17944,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15343,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4324,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1695,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: तिच्या जगण्याचा उंबरठा का कुणी काढला?
तिच्या जगण्याचा उंबरठा का कुणी काढला?
https://1.bp.blogspot.com/-qRNzoB_W5t4/YCfmDEZOXKI/AAAAAAABoNY/srbNngOx0zsIe2fAYriOt-BQ7M8S_6IvwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-qRNzoB_W5t4/YCfmDEZOXKI/AAAAAAABoNY/srbNngOx0zsIe2fAYriOt-BQ7M8S_6IvwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_884.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_884.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content