$type=ticker$snippet=hide$cate=0

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा

  श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोके वर काढले आहे. श्रीनगरच्या बाराजुल्ला परिसरातील बाजारात एके-47 सह मुक्तपणे संचार ...

 

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोके वर काढले आहे. श्रीनगरच्या बाराजुल्ला परिसरातील बाजारात एके-47 सह मुक्तपणे संचार करणार्‍य अतिरेक्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. अचानक बेछुटपणे सुरू केलेल्या या गोळीबारात बेसावध असलेले दोन पोलिस हुतात्मा झाले. हे दोन्ही पोलिस जम्मू-काश्मीर पोलिस दलातील आहेत. या चकमकीनंतर पोलिस आणि सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. 


कॉन्स्टेबल सुहैल अहमद आणि मोहम्मद युसूफ असे या दोन पोलिस शिपायांचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक अतिरेकी मार्केटमध्ये घुसला आणि एका दुकानाच्या बाहेर उभे राहून त्याने दोन पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर हा अतिरेकी फरार झाला. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. टीआरएफ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. त्यात एका अतिरेक्याच्या हातात एके-47 असून हा अतिरेकी मार्केटमध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. सुरक्षा दलाने या सीसीटीव्ही फुटेजवरून अतिरेक्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते दोन अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. फायरिंग केल्यानंतर हे दोन्ही अतिरेकी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलिस, राज्य राखीव दल, आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या परिसरात त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. हुतात्मा झालेले पोलिस हे श्रीनगर एअरपोर्ट ते श्रीनगर शहर रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावर तैनात होते. बाजूलाच बगात बाराजुल्ला पोलिस चौकीही आहे. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार हे अतिरेकी कोणत्या तरी गल्लीतून आले आणि फायरिंग करून फरार झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शोपियांमध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या वेळी सुरक्षा दलाने अतिरेक्यांकडी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा जप्त केला. या चकमकीनंतर आता संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. शोपियांमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून संयुक्त कारवाई केली. शोपियांमध्ये चकमक सुरू असतानाच बडगाममध्येही सुरक्षा दल, पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये जोरदरा चकमक झाली. या वेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद हे हुतात्मा झाले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे







Name

] ब्रेकिंग,859,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5746,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,193,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,33,satara,132,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10294,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,702,देश,4424,नाशिक,803,पुणे,732,बीड,1435,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16349,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13576,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3682,विदेश,650,संपादकीय,1545,सातारा,3198,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_xs_100/public/news-story/cover-images/2soldier_49.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_894.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_894.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content